Thief Arrest
Thief Arrestsakal media

एकाच रात्री सहा दुकाने फोडली; उल्हासनगरातून २४ तासांत त्रिकुटाला अटक

Published on

उल्हासनगर : शहरातील मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या जपानी बाजारातील सहा दुकाने चोरट्यांनी (Robbery in six shops) एका रात्रीत फोडली होती. सीसी टीव्हीच्या (cctv) आधारे पोलिसांनी अवघ्या २४ तासांत त्रिकुटाला अटक (Three culprit arrested) केली. कॅम्प दोनमधील नेहरू चौकजवळील जपानी बाजारमध्ये गोपाल खत्री यांचे दुकान आहे. त्यांच्या शेजारी कमल पारवाणी यांचे अगरबत्तीचे, असे या परिसरातील एकूण सहा दुकानांचे शटर उचकटून शुक्रवारी पहाटे चोरट्यांनी हजारो रुपयांच्या रकमेवर (Money robbery) डल्ला मारला होता.

Thief Arrest
मंत्रालयाच्या गेटवरून निघाला आणि स्वत:वरच गोळी झाडली, SRPF जवानाचा मृत्यू

याप्रकरणी व्यापाऱ्यांनी उल्हासनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी परिसरातील सीसी टीव्ही फुटेजच्या साह्याने सापळा रचून संशयित आरोपी सचिन उर्फ सच्या त्रंबक अंबोरे, मदन किसन तुपे, अमन विनोद गुप्ता यांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली. अटक केलेले आरोपी सराईत चोर असून आणखीन काही गुन्हे केले आहेत का, याची चौकशी सुरू असल्याची माहिती उल्हासनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com