

Bhuleshwarcha Raja
ESakal
मुंबई : दक्षिण मुंबईतील भुलेश्वर भागात शनिवारी रात्री 'भुलेश्वरचा राजा'च्या आगमन सोहळ्यादरम्यान गणेशमूर्ती अचानक कोसळल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले आहेत. मंडपापासून अवघ्या ५० ते ६० मीटर अंतरावरच कबुतरखान्याजवळील बाळाराम मर्चेंट रोड, जय अंबे चौक परिसरात रात्री ९.५१ च्या सुमारास ही घटना घडली.