भुशी धरण 'ओव्हर फ्लो'; पर्यटकांची होणार गर्दी

lonavala.jpg
lonavala.jpg

लोणावळा : लोणावळा परिसरात सध्या पावसाची संततधार सुरूच असून पर्यटकांचे सर्वाधिक आकर्षणाचे केंद्र असलेले भुशी धरण 'ओव्हर फ्लो' झाले आहे. सोमवारी (ता.०१) सकाळी लोणावळा परिसरात ५१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून एकूण ७३८ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

सध्या पाऊस लांबल्याने भुशी धरण भरण्याच्या प्रतीक्षेत होते. पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला होता. मात्र गेले पाच दिवस परीसरात मुसळधार पाऊस सुरू आहे.

भुशी, लोणावळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत चांगला पाऊस झाल्याने सोमवारी भुशी धरण शंभर टक्के भरले आहे. प्रतीक्षेत असलेले भुशी धरण भरल्याने धरणाच्या सांडव्यावर वर्षा विहारासाठी येत्या वीकेंडला पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com