मत्स्यव्यवसाय मंत्र्यांकडून मच्छिमारांना मोठा दिलासा, थेट बँक खात्यात जमा होणार पैसे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 May 2020

डिझेल परतावा वाटपास अर्थविभागाची परवानगी मिळाली असून त्यासंबंधीचे निर्देश संबंधित विभागास देण्यात आलेले आहेत.

मालाड : कोरोनाच्या संकटात महाराष्ट्रातील मच्छिमारांना मोठा दिलासा मिळाला आहे. डिझेलवरील परताव्याच्या रक्कमेस वित्त विभागाने परवानगी दिली असून येत्या काही दिवसांत थेट लाभार्थी हस्तांतरणाद्वारे (डी.बी.टी) ही रक्कम मच्छिमारांच्या बँक खात्यांमध्ये जमा होणार असल्याची माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.

नक्की वाचा : मद्य खरेदीसाठी आता 'इ-टोकन'; राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा निर्णय

अस्लम शेख म्हणाले की, डिझेलवरील परताव्यासाठी तरतूद करण्यात आलेल्या 110 कोटींच्या निधीपैकी फेब्रुवारी 2020 अखेरपर्यंत 78 कोटी डिझेल परताव्याचा निधी वितरीत करण्यात आला होता. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठीच्या उर्वरीत 32 कोटींपैकी 19.35 कोटीचा निधी कोरोनाच्या संकटामुळे पडून होता. 31 मार्च 2020 रोजी हा निधी परत गेला.

हे ही वाचा गावी जायंचय मग, 'ई-पास' मिळवण्याची प्रक्रिया जाणून घ्या

कोरोनाच्या संकटात मच्छिमार बांधवांना दिलासा देण्यासाठी हा निधी परत आणण्याच्या दृष्टीने अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात येत होता. डिझेल परतावा वाटपास अर्थविभागाची परवानगी मिळाली असून त्यासंबंधीचे निर्देश संबंधित विभागास देण्यात आलेले आहेत. मुंबई शहर व उपनगरासाठीचा 12 कोटी 65 लाख रुपयांचा निधीचे धनादेशही सहायक आयुक्तांकडे जमा झालेले आहेत, असेही अस्लम शेख यांनी सांगितले.

Big announcement for fishermen from Fisheries Minister


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big announcement for fishermen from Fisheries Minister