दीपिका, श्रद्धा, रकुल यांच्या ब्रॅण्डच्या जाहिरातीवर मोठा परिणाम, साराला एका ब्रॅण्डकडून डच्चू

संतोष भिंगार्डे
Sunday, 27 September 2020

दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुलप्रीत सिंग या बॉलिवुडमधील आघाडीच्या अभिनेत्री आहेत. अनेक जाहिरातदारांनी त्यांना त्यांच्या ब्रँडची जाहिरात करण्यासाठी साईन केले आहे.

मुंबई:  गेले काही दिवस बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण चांगलंच वळण घेताना दिसत आहे. यात नावं आलेल्या दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुलप्रीत सिंग या बॉलिवुडमधील आघाडीच्या अभिनेत्री आहेत. अनेक जाहिरातदारांनी त्यांना त्यांच्या ब्रँडची जाहिरात करण्यासाठी साईन केले आहे. आता या अभिनेत्रींची नावे ड्रग्स प्रकरणात आल्यावर या जाहिरातींचे पुढे काय होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

चित्रपटांप्रमाणेच सेलिब्रिटींना पैसे मिळण्याचं दुसरं माध्यम म्हणजे मोठमोठ्या प्रोडक्ट्सच्या जाहिराती. हा आकडा जवळजवळ कोट्यवधी रुपयांच्या घरात असतो. ड्रग्स प्रकरणात नावे आलेल्या अभिनेत्री दीपिका पदुकोणने 22 ते 25 ब्रँड आणि प्रोडक्ट्सच्या जाहिराती करीत आहेत. आणखीन काही जाहिराती तिने साईन केल्या आहेत. आता त्यांचे काय होणार असा प्रश्न आहे. तसेच अभिनेत्री सारा अली खान देखील सध्या एका प्रसिध्द ब्रँडच्या जाहिरातीत आपल्याला दिसते. तिच्याकडे श्रद्धा कपूरपेक्षा अधिक ब्रॅण्डच्या जाहिराती आहे. जवळपास पंधरा ते सोळा ब्रॅण्डना ती प्रमोट करते.

अधिक वाचाः  मध्य रेल्वे मार्गावरही महिला प्रवाशांसाठी विशेष लोकल सुरु करा, महिला प्रवाशांची मागणी

आता मिळालेल्या माहितीनुसार,  एका प्रख्यात ब्रॅण्डने तिला आपल्या जाहिरातीतून हटविले आहे आणि ते आता नव्या अभिनेत्रीला त्यामध्ये घेणार आहे. त्यामुळे ड्र्ग्जमुळे सारा अली खानला मोठा फटका बसला आहे. त्याचप्रमाणे अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि रकुलप्रीत सिंगलासुद्धा काही नामांकित प्रोडक्ट्सच्या जाहिरातीत आपण बघतो. 

अधिक वाचाः  फडणवीसांच्या भेटीबद्दल उद्धव ठाकरेंना कल्पना होतीः संजय राऊत

श्रद्धा कपूरकडे दहा ते बारा ब्रॅण्ड आहेत. त्यामुळे ड्रग्स प्रकरणात या अभिनेत्रींची नावे आल्यानंतर जाहिरातदार पुन्हा त्यांना आपल्या पुढच्या जाहिरातीत घेतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि जर त्यांना जाहिरातीत घेतले तर त्याचा प्रोडक्ट्सच्या विक्रीवर कसा परिणाम होतो हे पाहणे महत्वाचे ठरेल.

------------------

(संपादनः पूजा विचारे) 

Big impact on brand promotion Deepika Shraddha Rakul Sara remove from brand


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big impact on brand promotion Deepika Shraddha Rakul Sara remove from brand