'क्लिन चीट' मुख्यमंत्र्यावर काँग्रेसचा जमीन गैरव्यवहाराचा आरोप

सोमवार, 2 जुलै 2018

नवी मुंबईत सिडकोच्या २४ एकर जामिनीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संगनमताने तब्बल 1700 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसकडून आज (सोमवार) पत्रकार परिषद घेत करण्यात आला. कोयना प्रकल्पग्रस्तांची जमीन खासगी बिल्डरांना कवडीमोल दराने दिल्याचा आरोप काँग्रसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला. तर, प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी महाराष्ट्राला क्लिन चीट मुख्यमंत्री मिळाला असून, त्यांचा गैरव्यवहारात समावेश असल्याचे म्हटले आहे.

नवी मुंबई- नवी मुंबईत सिडकोच्या २४ एकर जामिनीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संगनमताने तब्बल 1700 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसकडून आज (सोमवार) पत्रकार परिषद घेत करण्यात आला. कोयना प्रकल्पग्रस्तांची जमीन खासगी बिल्डरांना कवडीमोल दराने दिल्याचा आरोप काँग्रसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला. तर, प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी महाराष्ट्राला क्लिन चीट मुख्यमंत्री मिळाला असून, त्यांचा गैरव्यवहारात समावेश असल्याचे म्हटले आहे.

पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे - 

  • सिडको, पॅराडाईज बिल्डर आणि नगर विकास खाते यांच्यात साटंलोटं असल्याचा काँग्रेसचा आरोप
  •  1.84 लाख रुपये/स्क्वेअर फुट दर असलेली जमीन बिल्डरला केवळ 371 रुपये/स्क्वेअर फुट किंमतीने विकली
  •  या जमीन गैरव्यवहारात अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा हात
  • अशा प्रकारे जमीन बिल्डरला विकणे शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे; काँग्रेसचा आरोप
  • या जमीनीचा व्यवहार करताना सगळे नियम धाब्यावर बसवण्यात आले.
  • या गैरव्यवहाराची न्यायालयीन चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचाराचा आरोप झाला कि क्लिनचीट देतात- सुरजेवाला यांचा आरोप  
Web Title: Big Land Scam In Navi Mumbai cidco Chief Minister Devendra Fadnavis