मुंबईत उभारण्यात येणाऱ्या 'मुंबई आय' प्रकल्पाबाबत मोठी बातमी...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 March 2020

मुंबई : आठशे फूट उंचीवरून पर्यटकांना मुंबईचे दर्शन घडावे यासाठी लंडन आयच्या धर्तीवर वांद्रेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून मुंबई आय प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक कंपन्यांना निविदा सादर करायच्या होत्या. याची अंतिम तारीख 6 मार्च होती. मात्र एकाही कंपनीने प्रतिसाद न दिल्यानेनिविदा प्रक्रियेस आणखी 15 दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे असे एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

मोठी बातमी - "कोराना"बाबत अकलेचे तारे! म्हणे नित्य नियमाने "अग्निहोत्र" करा ! 

'मुंबई आय' उभारण्याची जबाबदारी एमएमआरडीएकडे असून 12 फेब्रुवारी रोजी या प्रकल्पाबाबतच्या सूचना-हरकती जाणून घेण्यासाठी एमएमआरडीए मुख्यालयात इच्छुक कंपन्यांची विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत आठ कंपन्यांमधून जवळपास 20 प्रतिनिधी सहभागी झाले होते. यात लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्‍चर, एस्सेल वर्ल्ड, प्रकाश अम्युजमेंट्‌स, हितेन सेठी अँड असोसिएट्‌स आदी कंपन्यांचा समावेश होता. या कंपन्यांच्या प्रतिनिधींचे म्हणणे होते की, या प्रकल्पाला आणखी जागा हवी आहे. यावेळी इतर अनेक मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली असून 'मुंबई आय'ची उंची किती असावी, पार्किंगची व्यवस्था, बांधकाम कालावधी, अपेक्षित निधी आदी विषयांवर प्रकाश टाकण्यात आला. याचवेळी सदर प्रकल्पासाठी 1 एकरहून अधिक जागा लागण्याची शक्‍यता असल्याचे बहुतांश कंपन्यांनी व्यक्त केली. परंतु नियोजित जागी पुरेशी जागा नसल्याने इच्छुक कंपन्यांनी याकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी निविदा सादर करण्याची मुदत 20 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. 

मोठी बातमी - सावधान ! आजच सोडा धूम्रपान, नाहीतर भोगा 'हे' गंभीर परिणाम

काय आहे 'लंडन आय' 

लंडनमध्ये साधारण 1999 साली 435 फूट उंचीचे 'लंडन आय' बांधण्यात आले. या पर्यटनस्थळाला दरवर्षी सुमारे अंदाजे 30 लाख पर्यटक भेट देतात. यामधून, लंडन आय वर्षाकाठी सुमारे अंदाजे 70 कोटी पाऊंड महसूल जमा होतो. याच धर्तीवर, 'मुंबई आय'च्या माध्यमातून देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्याचा राज्य सरकारचा उद्देश आहे. 

big news about dream project of aaditya thackerays mumbai eye

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: big news about dream project of aaditya thackerays mumbai eye