सावधान ! आजच सोडा धूम्रपान, नाहीतर भोगा 'हे' गंभीर परिणाम

सावधान ! आजच सोडा धूम्रपान, नाहीतर भोगा 'हे' गंभीर परिणाम

मुंबई : जगात धूम्रपान करणाऱ्या लोकांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. धूम्रपान करणं आरोग्यासाठी वाईट असतं हे माहित असूनही लोकं सर्रास धूम्रपान करताना दिसतात. या धूम्रपानाचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतात. 

जगात एकूण धूम्रपान करणाऱ्या लोकांपैकी तब्बल १२ टक्के लोकं भारतात राहतात. धुम्रपानामुळे अतिशय गंभीर प्रकारचे रोग होतात. भारतात दरवर्षी तब्बल १ कोटीपेक्षा जास्त लोकं धुम्रपानामुळे मृत्युमुखी पडतात. धूम्रपान म्हणजेच सिगारेट ओढणे आणि तंबाखू असलेल्या पदार्थांचं सेवन करणे. तंबाखूयुक्त पदार्थांचं सेवन केल्यामुळे निरनिराळ्या प्रकारचे गंभीर आजार होण्याची भीती असते. तसंच  धूम्रपान केल्यामुळे पुरुषांचं आयुष्य तब्बल १२ वर्षांनी तर महिलांचं आयुष्य तब्बल ११ वर्षांनी कमी होतं.  

तंबाखूमध्ये दोन अतिशय घातक पदार्थ असतात. कार्बन मोनॉक्साईड आणि टार (डांबर). कार्बन मोनॉक्साईड शरीरात असणाऱ्या ऑक्सिजनला शरीरात योग्य रित्या पसरू देत नाही. तसंच ऑक्सिजनचं प्रमाणही कमी करतो. टार म्हणजेच डांबर शरीराच्या आतमध्ये जाऊन तुमच्या फुप्फुसांवर थेट वार करतं आणि यामुळे तुमची श्वसनप्रक्रिया सुरळीत होऊ शकत नाही.

धूम्रपान केल्यामुळे तुम्हाला कोणते गंभीर आजार होऊ शकतात वाचा

(१) कॅन्सर:

भारतात एकूण कॅन्सरग्रस्त लोकांपैकी ८० टक्के लोकं कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडतात. यात ५० टक्के लोकं धूम्रपान केल्यामुळे होणाऱ्या कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडतात. तंबाखूयुक्त धूम्रपानात तब्बल ७००० प्रकारचे रसायनं असतात ज्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. धुम्रपानामुळे तोंडाचा, पोटाचा, किडनीचा, यकृताचा, फुप्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो. 

(२) हृदयविकार:

तंबाखूयुक्त पदार्थांचं सेवन केल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची भीती असते. धूम्रपान केल्यामुळे शरीरात रक्ताभिसरण प्रक्रिया कमी होत जाते.  तुमच्या हृदयापर्यंत रक्ताचा पुरवठा कमी प्रमाणात होतो. यामुळे हृदयविकाराचा तीव्र झटका येण्याची चिन्हं असतात. शिवाय छाती दुखणे, हृदयाचे ठोके कमी होणे असेही त्रास धुम्रपानामुळे होतात.

(३) प्रजनन क्षमता:

मोठ्या प्रमाणावर धूम्रपान केल्यामुळे पुरुष आणि महिला दोघांमध्येही प्रजनन क्षमता कमी होत जाते. धूम्रपान करणाऱ्या बहुतांश  महिला आई होऊ शकत नाहीत. शिवाय त्यांना गरोदर राहण्यातही बराच त्रास सहन करावा लागतो. धूम्रपान करणाऱ्या महिलांचा गर्भपात होण्याचीही शक्यता असते.तसंच त्यांचं बाळ कमी वजनाचं आणि अशक्त जन्माला येण्याची भीती असते.

(४) त्वचेचे आजार:

धुम्रपान केल्यामुळे जास्त प्रमाणात ऑक्सिजन आपल्या शरीराला मिळत नाही. त्यामुळे त्वचेचे आजार होण्याची भीती असते. त्वचा कोरडी व्हायला सुरुवात होते आणि तुम्ही तुमच्या वयापेक्षा १०-२० वर्ष मोठे दिसु लागता. त्वचा पांढरी पडू लागते आणि त्वचेवर सुरकुत्या पडायला सुरुवात होते. 

 काय आहेत धूम्रपान सोडण्याचे फायदे: 

धूम्रपान करणं बंद केल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते. तसंच तोंडाचाआणि पोटाचा कॅन्सर होत नाही. धूम्रपान सोडून लोकं सामान्य आणि निरोगी जीवन जगू शकतात. त्यामुळे तुम्हीही धूम्रपान करत असाल तर लवकरात लवकर ते सोडा आणि तुमचं आयुष्य वाढवा. 

Quit Smoking otherwise be ready to face these health problems read full story  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com