esakal | मोठी बातमी! अनिल देशमुख यांच्या जावयाला सीबीआयनं घेतलं ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

anil deshmukh

मोठी बातमी! अनिल देशमुख यांच्या जावयाला सीबीआयनं घेतलं ताब्यात

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई डॉ. गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयनं ताब्यात घेतलं आहे, सुत्रांनी ही माहिती दिली. पण देशमुख यांच्या कुटुंबियांनी डॉ. चतुर्वेदी यांचं अपहरण झाल्याचा आरोप केला आहे. कुठलीही माहिती न देता या दोघांना ताब्यात घेतल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे.

हेही वाचा: मुख्यमंत्री अशोक गेहलोत चौथ्यांदा राज्यपालांच्या भेटीला; काय घडलं? 

देशमुख यांच्या सून राहत देशमुख यांनी आरोप केला की, "त्यांच्या वरळी येथील घराखाली ८ ते १० लोक एका पांढऱ्या इनोव्हा कारमधून आले. साध्या कपड्यांमध्ये असलेल्या या लोकांनी डॉ. गौरव चतुर्वेदी आणि त्यांच्या वकिलांना जवळील फोन जप्त करुन त्यांना कारमधून घेऊन गेले. सध्या आम्ही यासंदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी वरळी पोलीस ठाण्यात आलो आहोत. आज (बुधवार) संध्याकाळी सहा वाजता ही घटना घडली"

हेही वाचा: झेडपीच्या शाळांचा होणार कायापालट; अशा असतील सुविधा...

सुत्रांच्या माहितीनुसार, सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. पण अद्याप त्यांनी अधिकृतरित्या हे जाहीर केलेलं नाही. या ठिकाणी त्यांची प्राथमिक चौकशी करण्यात येत आहे.

loading image
go to top