मोठी बातमी : मुंबई-गोवा महामार्गावर LPG टँकर उलटला; रात्रभर महामार्ग राहणार बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

LPG Tanker

मोठी बातमी : मुंबई-गोवा महामार्गावर LPG टँकर उलटला; रात्रभर महामार्ग राहणार बंद

मुंबई-गोवा महामार्गावर LPGची वाहतूक करणारा टँकर उलटल्याचं वृत्त आहे. या टँकरची क्षमता मोठी असल्यानं या गॅस गळतीचा धोका कमी करण्याच्या कामाला उशीर लागणार आहे. त्यामुळं मुंबई-गोवा महामार्ग रात्रभर बंद राहणार आहे. पोलिसांच्या हवाल्यानं एबीपी माझां याबाबत वृत्त दिलं आहे. (Big News LPG tanker overturns on Mumbai Goa highway highway will remain closed overnight)

हेही वाचा: रुपया पुन्हा गडगडला! डॉलरच्या तुलनेत विक्रमी घसरण

दुर्घटनाग्रस्त टँकरची २८ हजार किलो एलपीजी गॅस वाहून नेण्याची क्षमता आहे. टँकर पलटल्यानंतर यातून वायू गळती होत होती. प्राथमिक स्वरुपाची काळजी घेऊन ही वायू गळती रोखण्यात आली आहे. पण टँकरमधील वायूची क्षमता पाहता, सर्व सुरळीत होईपर्यंत या महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. त्यानुसार, रात्रभर मुंबई-गोवा महामार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा: वेदांतानंतर 'PhonePe'ची बारी, गब्बर होतायेत शेजारी; रोहित पवारांच्या ट्विटनं खळबळ

हा महामार्ग बंद असला तरी वाहनांसाठी याला पर्यायी मार्ग आहे. हा पर्यायी मार्ग म्हणजे लांजा-देवधे-पुणद पुढे रत्नागिरीतून मुंबई हायवेला जाता येऊ शकते. तसेच पालीमार्गे देखील बाहेर पडता येऊन तिथून दाभोळमार्गे मुंबईकडं जाता येऊ शकतं. असे दोन पर्यायी मार्ग उपलब्ध आहे.

दरम्यान, या वायू गळतीचा आढावा घेण्यासाठी उरण आणि गोव्यातून घटनास्थळी तज्ज्ञांची टीम दाखल होणार आहे.

Web Title: Big News Lpg Tanker Overturns On Mumbai Goa Highway Highway Will Remain Closed Overnight

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai News