समोर रिक्शा आल्याने बाईकचा तोल गेला आणि...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 March 2020

किराणा माल आणण्यासठी वाशीला जात असताना झाला अपघात

ठाणे - मुंब्रा-पनवेल मार्गावरील शिळ-महापे येथे सोमवारी (ता. 9) एक दुचाकीस्वार घसरून ट्रकखाली सापडल्याने त्याचा मृत्यू झाला. शिवकुमार वर्मा (23) असे मृताचे नाव असून तो कल्याण पूर्व येथील रहिवासी होता.

हेही वाचा - धक्कादायक! कोरनाने घेतला २ लाख कोंबड्यांचा जीव

शिवकुमार त्याचा शेजारी कपिल भानुशाली (24) याच्यासोबत दुचाकीवरून वाशी मार्केट येथे किराणा माल आणण्यासाठी निघाला होता. या अपघाताची शिळ-डायघर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून ट्रकचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. 

हेही वाचा - भिवंडीत थेट इराणचा कांदा

मुंब्रा-पनवेल मार्गे कपिल आणि शिवकुमार हे दोघेही दुचाकीवरून वाशी मार्केटला निघाले होते. तेव्हा, मुंब्रा येथील खान कंपाऊंडच्या गेटसमोरील रस्त्यावर अचानक समोर आलेल्या रिक्षाला बघून कपिल याने दुचाकीला तत्काळ ब्रेक लावला. त्यामुळे त्यांची दुचाकी जागीच घसरून दोघेही दुचाकीवरून पडले. त्यात पाठीमागे बसलेला शिवकुमार थेट शेजारून निघालेल्या ट्रकच्या चाकाखाली सापडून गंभीर जखमी झाला. त्यानंतर रुग्णालयात उपचार करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. 

web title : bike accident at thane one dead


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bike accident at thane one dead