बाईक ऍम्ब्युलन्स सेवेचा विस्तार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

मुंबई - आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वैद्यकीय उपचार देण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या मोटार बाईक ऍम्ब्युलन्स सेवेचा विस्तार करण्यात आला आहे. या सेवेत आज आणखी 20 मोटार बाईकचा समावेश करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या संकल्पनेतून आरोग्य विभागाच्या शिव आरोग्य योजना व आपत्कालीन वैद्यकीय सेवेअंतर्गत गेल्या वर्षापासून मोटार बाईक ऍम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात आली होती. त्या वेळी मुंबईत 10 बाईक ऍम्ब्युलन्स सुरू करण्यात आल्या होत्या. या बाईक ऍम्ब्युलन्स मुंबईसह पुणे, ठाणे, अमरावती, पालघर, नंदुरबार या ठिकाणी सेवा देणार आहेत. 108 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर ही बाईक ऍम्ब्युलन्स तत्काळ उपलब्ध होऊन रुग्णावर प्राथमिक उपचार सुरू करण्यात येतात.
Web Title: bike ambulance service expansion