दुचाकी खरेदीचा उच्चांक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 एप्रिल 2017

मुंबई - न्यायालयाने बीएस-३ मानकाचे (भारत स्टॅन्डर्ड स्टेज) इंजिन असलेल्या वाहनांच्या खरेदी-विक्रीला बंदी घातल्यानंतर मुंबईत वाहन खरेदीने उच्चांक गाठला आहे. मुंबईतील आरटीओ कार्यालयांनीही कोटींची उड्डाणे घेतली. शहर आणि उपनगरात ३१ मार्च रोजी एका दिवसात एक हजार ८५३ वाहनांची नोंदणी झाली.

आरटीओ कार्यालयांमध्ये वाहन नोंदणीसाठी गर्दी झाल्याने आरटीओने ३१ मार्चला रात्री उशिरापर्यंत कामकाज सुरू ठेवले होते. मुंबईतील आरटीओ कार्यालयांमध्ये १५४० दुचाकी आणि ३१३ कारची नोंद करण्यात आली. वाहन नोंदणीमुळे परिवहन विभागाच्या उत्पन्नातही भर पडली आहे. राज्यभरातील आरटीओ कार्यालयांमध्ये दररोज सुमारे ८ ते ९ हजार वाहनांची नोंदणी होते, मात्र दोन दिवसांत २५ ते ३० हजार गाड्यांची नोंदणी झाली असावी, असे आरटीओतील एका अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Bike shop high

टॅग्स