अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीवर हल्ला करणाऱ्या दुचाकीस्वारांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 April 2020

एक दुचाकी सलग त्यांच्या गाडीचा पाठलाग करीत होती. दुचाकी जवळपास गाडीच्या सोबतच होती. नंतर त्यांनी गाडी थांबविण्याच्या हेतूने दुचाकी गाडीसमोर आणली. यानंतर त्यांच्यातील एकजण गाडीजवळ आला आणि माझ्याकडे बोट दाखवत खिडकीवर हात आदळू लागला.

मुंबई - रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि त्यांच्या पत्नीवर रात्री उशीरा हल्ला करुन पळ काढण्याच्या तयारीत असलेल्यांना सुरक्षा रक्षकानी पकडुन पोलिसांच्य स्वाधिन केलेआहे. याप्रकरणी एन. एम जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करीत, याचा अधिक तपास करण्यास सुरुवात केली आहे.

प्रदीपकुमार शर्मा आणि दिलीप बोराडे अशी अटक आरोपींची नावे आहेत. अर्णब गोस्वामी आणि त्यांची पत्नी साम्यब्रता रे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रात्री 12 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. अर्णब गोस्वामी यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती दिली.

३ मे नंतर काय होऊ शकतं ? दुसऱ्या लॉक डाऊन नंतर तिसरा लॉक डाऊन ?
 

काल नक्की काय घडलं ?  

अर्णब गोस्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक दुचाकी सलग त्यांच्या गाडीचा पाठलाग करीत होती. दुचाकी जवळपास गाडीच्या सोबतच होती. नंतर त्यांनी गाडी थांबविण्याच्या हेतूने दुचाकी गाडीसमोर आणली. यानंतर त्यांच्यातील एकजण गाडीजवळ आला आणि माझ्याकडे बोट दाखवत खिडकीवर हात आदळू लागला. या इसमाचा खिडकीची काचा फोडण्याचा प्रयत्न होता. यावेळी त्याने कारवार शाई फेकली. 

या हल्ल्यात अर्णब गोस्वामी आणि पत्नी  सुदैवाने कोणतीही दुखापत झालेले नाही.
हल्ला केल्यानंतर गोस्वामी यांच्या सुरक्षा रक्षकांनी पळूण जाण्याच्या तयारीत असलेल्या हल्लेखोरांना पकडले. त्यानंतर याची माहिती एन.एम जोशी मार्ग पोलिसांना देताच, पोलिसांनी या दोघांच्या मुसक्या आवळल्या.

धोक्याची घंटा, नागरिकांनो सावधान ! वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतायत 'मे' महिन्यात कोरोनाचा विस्फोट

हल्याचे कारण अद्याप समजले नाही. मात्र अर्णब गोस्वामी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीवर काही आरोप तसेच टीका केली होती. त्याप्रकरणी गोस्वामी यांच्याविरोधात देशभर विविध ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या हल्ल्याचा या प्रकरणाशी संबंध आहे का, याबाबत पोलिस तपास करत आहेत. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करण्यास सुरुवात केली.

biker who attacked arnab goswami and his wife is under arrest


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: biker who attacked arnab goswami and his wife is under arrest