esakal | अंधेरीत कोट्यवधी रुपयांचा ड्रग्जसाठा जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

अंधेरीत कोट्यवधी रुपयांचा ड्रग्जसाठा जप्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अंधेरी : कोट्यवधी रुपयांचा ड्रग्जचा साठा येथील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला. हा साठा ऑस्ट्रेलिया येथे पाठविण्यात येणार होता; मात्र या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करांचा ड्रग्ज विदेशात पाठविण्याचा प्रयत्न फसला आहे. हा ड्रग्ज तिथे कोणी पाठविला होता याचा आता एनसीबी अधिकारी तपास करीत आहे.

अंधेरी परिसरातील एका कुरिअर कंपनीत मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा ठेवला आहे. ते पार्सल मुंबईहून हैदराबाद आणि नंतर ऑस्ट्रेलिया येथे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यां‍ना मिळाली होती. ही माहिती प्राप्त होताच मुंबई युनिटच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यां‍नी संबंधित कुरिअर कंपनीत छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी काही पार्सल ताब्यात घेतली असून, त्यात या अधिकाऱ्यांना चार किलो सहाशे ग्रॅम वजनाचे एफेड्रीन नावाचे ड्रग्ज सापडले.

हेही वाचा: Adani Port | ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करा - न्यायालयाचे निर्देश

ते ड्रग्ज चादरीमध्ये गुंडाळून ठेवले होते. लवकरच ते पार्सल ऑस्ट्रेलिया येथे पाठविण्याचा प्रयत्न होता; मात्र या कारवाईमुळे हा प्रयत्न फसला आहे. पार्सल तिथे कोणी पाठविले होते, यापूर्वीही अशाप्रकारे पार्सल पाठविण्यात आले होते का, याचा आता एनसीबीचे अधिकारी तपास करीत आहेत.

loading image
go to top