उल्हासनगरातील सफाई कर्मचाऱ्यांवर बायोमेट्रिक मशीनचा वॉच

दिनेश गोगी
रविवार, 22 जुलै 2018

उल्हासनगर - सकाळी कामावर आल्यावर आणि झाडू मारण्याचे साफसफाईचे काम केल्यावर मध्येच कामावरून गायब होणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांवर 21 बायोमेट्रिक मशीनचा वॉच ठेवण्यात येणार आहे. पालिका आयुक्तांनी या मशीनला हिरवा कंदील दाखवला आहे. आता दिवसातून तिनदा ही मशीन हजेरी टिपणार असल्याने यापुढे कल्टी मारण्याच्या प्रकाराला आळा बसणार आहे, असे मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे यांनी सांगितले आहे.

उल्हासनगर महानगरपालिका मुख्यालयात तीन इलेक्ट्रॉनिक बायोमेट्रिक मशिन्स लावण्यात आलेल्या सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कामावर येणाऱ्या आणि सायंकाळी पावणेसहा वाजता मुख्यालय सोडताना कर्मचाऱ्यांना त्यावर अंगठयाचे निशाण नमूद करावे लागते. मात्र, 20 पॅनल मध्ये काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक मशिन्स नसल्याने ते सकाळी झाडू मारल्यावर, नालेसफाई केल्यावर कामावरून मध्येच कल्टी मारून घरी जातात. तर, सफाई कर्मचारी त्यांच्या जागी त्रयस्थ व्यक्ती कडून काम करून घेतात. अशा तक्रारी आयुक्त गणेश पाटील, मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर, आरोग्य विभाग यांच्याकडे आल्या होत्या.

शहरात एकूण 20 पॅनल असून साफसफाई साठी प्रत्येक पॅनलमध्ये 55 सफाई कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत.मुळात सफाई कर्मचाऱ्यांची कामाची वेळ ही सकाळी 7 ते दुपारी 3 असताना मध्ये कल्टी मारण्याच्या आणि स्वतःच्या जागी त्रयस्थ व्यक्तीकडून काम करून घेण्याच्या प्रकाराला गांभीर्याने घेण्यात आले आहे. त्यासाठी 21 लहान बायोमेट्रिक मशीन्स घेण्यात आलेल्या आहेत. ह्या मशिन्स पॅनेलच्या क्षेत्रातील स्वच्छता निरीक्षकांच्या कार्यालयात ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यावर, सकाळी 7 दुपारी 12 आणि 3 वाजता अशी हजेरी नोंदवणे बंधनकारक करण्यात आलेले. मशीन प्रणालीच्या नोंदी नुसार कर्मचाऱ्यांचा पगार अदा केला जाणार असल्याचे मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे यांनी सांगितले आहे.

Web Title: Biometric Machine Watch on the Safai workers in Ulhasangar