'बीडीडी चाळींत रहिवाशांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण होणारच'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

मुंबई - ना. म. जोशी मार्ग व नायगाव येथील बीडीडी चाळींतील रहिवाशांनी पात्रता निश्‍चितीसाठी राबवण्यात येणाऱ्या बायोमेट्रिक सर्वेक्षणाला विरोध केला आहे. विरोध असला तरी बायोमेट्रिक सर्वेक्षण केले जाईल, अशी माहिती गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांनी शुक्रवारी दिली. सर्वेक्षणाला विरोध करणारे विरोध करतील; पण आम्ही आमचे काम करत राहू, असे स्पष्ट ते म्हणाले. 

शहर उपजिल्हाधिकाऱ्यांकडून बुधवारी ना. म. जोशी मार्ग व नायगाव येथील रहिवाशांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न झाला; मात्र लेखी करार करेपर्यंत या सर्वेक्षणाला विरोध राहील, असा पवित्रा रहिवाशांनी घेतल्याने सर्वेक्षण होऊ शकले नाही. रहिवाशांच्या तक्रारींची दखल घेत उपजिल्हाधिकारी कार्यालयाने म्हाडाला पत्र लिहून या प्रश्‍नावर तोडगा काढण्याची विनंती केली; मात्र शुक्रवारी गृहनिर्माणमंत्री महेता यांनी म्हाडा अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून तातडीने त्यांच्या तक्रारींबाबत खुलासा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही दिवसांत रहिवाशांना याची माहिती देण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. 

रहिवाशांसोबत करार कसा होणार, सर्वेक्षण कधी आणि कोणत्या प्रकारे होईल, संक्रमण शिबिरे कुठे आहेत, तेथील घरे कधी दिली जातील आणि पुनर्विकासाबाबतची माहिती वृत्तपत्रांत जाहिराती देऊन रहिवाशांपर्यंत पोहचवण्यात येईल, असे म्हाडाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Biometric survey of BDD Chalan will be conducted