esakal | 24 तासात 365 मृत पक्षांच्या तक्रारी; काय करावे? काय करू नये?
sakal

बोलून बातमी शोधा

24 तासात 365 मृत पक्षांच्या तक्रारी; काय करावे? काय करू नये?

स्थालांतरीत पक्षांमुळे भारतात बर्ड फ्ल्यू आला असल्याची शक्यता आहे.

24 तासात 365 मृत पक्षांच्या तक्रारी; काय करावे? काय करू नये?

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई, ता. 14: 'बर्ड फ्ल्यू'च्या धर्तीवर महापालिकेनेे मार्गदर्शक नियमावली प्रसिध्द केली आहे. पक्षी, कोंबड्यांचे पिंजरे तसेच त्यांना खाण्यासाठी दिली जाणारी भांडी नियमित डिटर्जनने धुण्याबरोबरच मृत पक्षी दिसल्यास त्याला उघड्या हाताने स्पर्श करु नका असा सल्ला महापालिकेने दिला आहे. मागील 24 तासात 365 मृत पक्षांच्या तक्रारी महापालिककडे आल्या आहेत.

जिवंंत पक्षांना हाताळताना मास्क व ग्लोव्हजचा वापर करावा, पक्षी विक्री केल्यानंतर खुराड्यांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करावे अशी सूचना मांसविक्री करणाऱ्या दुकानदारांना केली आहे. मागील तिन दिवसांपासून पालिककडे 550 हून अधिक मृत पक्षांच्या तक्रारी आल्या आहेत. तर, गेल्या 24 तासात 365 मृत पक्षांच्या तक्रारी आहेत. मृत पक्षांची माहिती महापालिकेच्या 1916 या हेल्पलाईनला कळविण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

महत्त्वाची बातमी : धनंजय मुंडे प्रकरणी मोठी बातमी, रेणू शर्माच्या ट्विटमध्ये प्रताप सरनाईकांचा उल्लेख

पाणवठ्यांची माहिती द्या

स्थालांतरीत पक्षांमुळे भारतात बर्ड फ्ल्यू आला असल्याची शक्यता आहे. मुंबईत अनेक ठिकाणी तलाव,दलदलीच्या जागा आणि लहान पाणवठ्यांवर पक्षी येत असतात. याबाबत वन विभाग किंवा पशुसंवर्धन विभागाला माहिती देण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

काय करावे?

  • पक्ष्यांच्या स्त्राव व विष्ठेसोबत स्पर्श टाळावा.
  • पक्षी, कोंबड्यांचे पिंजरे आणि ज्या भांड्यात त्यांना रोज खाणे दिले जाते, अशी भांडी रोज डिटर्जंट पावडरने स्वच्छ धुवा.
  • शिल्लक उरलेल्या मांसाची योग्य विल्हेवाट लावा.
  • कच्चा पोल्ट्री उत्पादनासोबत काम करताना पाणी व साबणाने आपले हात वारंवार धुवा.
  • व्यक्तिगत स्वच्छता राखा. परिसर स्वच्छ ठेवा.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

काय करू नये?

  • कच्चे चिकन, अर्धवट शिजलेले चिकन किंवा अर्धवट उकडलेली अंडी खाऊ नका.
  • आजारी दिसणाऱ्या सुस्त पडलेल्या पक्ष्यांशी संपर्क टाळा. 
  • पूर्णपणे शिजलेले मांस आणि कच्चे मांस एकत्र ठेवू नका.
  • एखादा पक्षी मरण पावला तर अशा पक्षाला उघड्या हाताने स्पर्श करू नका.

bird flu Complaints of 365 dead birds in less than 24 hours What to do and What not to do

loading image