Flamingo Rare Sightings : दरवर्षी नोव्हेंबर महिना सुरू होताच फ्लेमिंगो खाडीकिनारी पाणथळांवर हजारोंच्या संख्येने दाखल होतात. मात्र यंदा परदेशी पाहुणे अजूनही आले नसल्याने त्यांच्या आगमनाचे वेध लागले आहे.
उरण : उरण खाडीकिनारी पाणथळांवर दरवर्षी हजारोंच्या संख्येने येणारे फ्लेमिंगोंचे दर्शन दुर्लभ झाले आहे. वातावरणातील सततच्या बदलांमुळे नोव्हेंबरमध्ये येणारे परदेशी पाहुणे अजूनही आले नसल्याने पक्षीप्रेमींना आगमनाचे वेध लागले आहेत.