धावत्या लोकलमध्ये झाला बाळाचा जन्म 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

लोकल ट्रेनमध्ये प्रसूतीच्या घटना घडत असतातच. अशा वेळी इतर महिला व सहप्रवाशांनी बघ्याची भूमिका न घेता वा न डगमगता मदत करावी; तसेच नजीकच्या शासकीय रुग्णालयाशी त्वरित संपर्क साधावा. 
- डॉ. संगीता माकोडे, उपजिल्हा शल्यचिकित्सक, सिव्हिल रुग्णालय

ठाणे : टिटवाळा-सीएसटी लोकलमध्ये महिलेने बाळाला जन्म दिल्याची घटना शुक्रवारी (ता. 5) मध्यरात्री ठाणे रेल्वेस्थानकात घडली. झेबा परवीन अन्सारी (रा. टिटवाळा) असे मातेचे नाव असून, दोघी मायलेकी सुखरूप असल्याची माहिती ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या उपजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संगीता माकोडे यांनी दिली. 

झेबा यांना शुक्रवारी (ता. 5) रात्री प्रसूतिवेदना सुरू झाल्याने कुटुंबीयांनी त्यांना राजावाडी रुग्णालयात नेण्याचे ठरवले. त्यामुळे रात्री 11.15 वाजता झेबा, पती व सासूसह टिटवाळा-सीएसटी लोकलने रुग्णालयात येण्यास निघाले. मध्यरात्री 12 वाजता लोकल ठाणे स्थानकादरम्यान असताना प्रसूतिवेदना असह्य होऊन तिने मुलीला जन्म दिला. सहप्रवासी व इतरांनी प्रसूतीसाठी साह्य केले. ठाणे स्थानकात उतरल्यावर तातडीने मायलेकींना ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

Web Title: The birth of a baby in the running local