Dombivli News : भाजपच्या जाहीरात होंर्डींगवर पालिकेची कारवाई; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारार्थ मोदी की गॅरंटी असे जाहीरातींचे होर्डींग कल्याण शीळ रोड परिसरात लागले असल्याची तक्रार निवडणूक विभागाकडे प्राप्त झाली.
bjp advertisement hoardings municipal action code of conduct violation first case
bjp advertisement hoardings municipal action code of conduct violation first caseSakal

डोंबिवली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारार्थ मोदी की गॅरंटी असे जाहीरातींचे होर्डींग कल्याण शीळ रोड परिसरात लागले असल्याची तक्रार निवडणूक विभागाकडे प्राप्त झाली. पालिकेची परवानगी न घेता बेकायदेशीर रित्या लावण्यात आलेल्या या होर्डींगवर पालिका प्रशासनाच्यावतीने रातोरात कारवाई करण्यात आली आहे.

याप्रकरणी जाहीरात एजन्सीवर मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे होर्डींग काढताना पालिका कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली असून अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचा सहारा पालिका कर्मचाऱ्यांना घ्यावा लागला. केडीएमसी हद्दीत आचारसंहितेचा हा पहिला गुन्हा आहे.

कल्याण लोकसभा निवडणूका जाहीर झाल्या असून लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी हद्दीत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी सार्वजनिक ठिकाणी व शासकीय कार्यालयाच्या परिसरात लावण्यात आलेले राजकीय पक्षांचे फलक, ध्वज काढण्यात आले आहेत.

पक्षाची चिन्हे, नावे झाकण्यात आली आहेत. आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये याबाबत आवाहन देखील प्रशासनाने केले आहे. आचारसंहितेचा भंग झाल्यास तातडीने गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून केडीएमसी हद्दीत आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परवानगी न घेता आचारसंहितेचा भंग करत हे होर्डींग लावले असल्याची तक्रार निवडणूक विभागाकडे प्राप्त झाली. प्राप्त तक्रारीनुसार केडीएमसीने या होर्डींगवर कारवाई करत ते रातोरात उतरविले आहेत.

केडीएमसी ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांच्या तक्रारीनुसार मानपाडा पोलिस ठाण्यात कळवा येथील ए.डी.प्रमोशन अॅडव्हर्टायझिंग एजन्सीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल तक्रारीनुसार सोमवारी सायंकाळी निवडणूक विभागाच्या अॅपवर तक्रार प्राप्त झाली होती.

तक्रारीत जाहीरातीचे फोटोंसह परवानगी शिवाय काही ठिकाणी पोस्टर, बॅनर लावण्यात आले आहेत असा संदेश दिला गेला होता. सदरचे ठिकाण हे डोंबिवली असे दर्शविले होते. त्यानुसार सहाय्यक आयुक्त भारत पवार यांसह फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी सर्जेराव जाधव, गणपत गायकवाड,

अरविंद म्हसकर, सावंत पाटील, रतन खुडे, विलास पाटील, भगवान पाटील, अमित गायकर, प्रकाश म्हात्रे, गणेश दळवी यांनी दावडी रिजन्सी येथे पाहणी केली. कल्याण शीळ रोडवर साई सिटी निळजे रोडलगत लोखंडी साच्यावर अंदाजे 10 ते 12 मजले उंच असा 40 बाय 40 फुट लांबी रुंदी आकाराचा होर्डिंग लावलेला पथकास आढळला.

त्यावर "4 कोटी पक्की घरे, बांधली आहेत, आणखी बांधली जातील मोदी ची गॅरंटी, पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन करा" असा मजकूर लिहिलेला होता. तसेच त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो होता.

हा जाहीरातीचा रंगीत होर्डिंग अनधिकृत रित्या लावुन आचारसंहिता कालावधीत मालमत्ता विदुपिकरन करून जाहिरात होर्डिंग लावण्यात आला असल्याचे निर्देषानास आले. याविषयी पवार यांनी केडीएमसीच्या मालमत्ता विभागाशी संपर्क करत विचारणा केली असता त्यांनी हे होर्डिंग ए.डी.प्रमोशन अॅडव्हर्टायझिंग सर्व्हिसेस असल्याचे सांगितले.

तरी नमुद कंपनीने कोणत्याही प्रकारे कल्याण डोंबिवली मनपा कार्यालयाकडुन पुर्व परवानगी न घेता ती बेकायदेषिर रित्या लावण्यात आली असल्याचे मालमत्ता विभागाच्या निर्देषनास आल्याने सदर घटनास्थळी जात पालिका कर्मचाऱ्यांनी ते होर्डींग हटविले.

त्याचा पंचनामा करुन ते ताब्यात घेत कार्यालयात सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले असल्याचे म्हटले आहे. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी हा पहिलाचा गन्हा दाखल झाला असून पालिका प्रशासन व निवडणूक विभागाने परिसरात बेकायदा होर्डींग, बॅनरची पहाणी करण्यावर जोर दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com