पालघरमध्ये शिवसेनेला झटका; भाजप आघाडीवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

पालघर लोकसभा पोटनिवडणुक शिवसेना आणि भाजपने याठिकाणी प्रतिष्ठेची लढाई बनविली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साम, दाम, दंड, भेद या ऑडिओ क्लिपमुळे ही निवडणूक चांगलीच गाजली होती. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही प्रचाराची राळ उडविली होती. 

मुंबई - नेत्यांची फोडाफोडी, मतदानाच्या टक्‍केवारीचा वाद आणि मतदान यंत्रातील घोळामुळे गाजलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपने सुरवातीच्या फेरीअखेर बाजी मारल्याचे चित्र आहे. तर, शिवसेनेला मोठा झटका बसला असून, बहुजन विकास आघाडी दुसऱ्या स्थानावर आहे.

पालघर लोकसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीच्या आज जाहीर होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सातव्या फेरीअखेर भाजपला 79 हजार मते मिळाली असून, बहुजन विकास आघाडीला 63 हजार मते आहेत. त्यामुळे भाजप जवळपास 16 हजार मतांनी आघाडीवर आहे. तर, शिवसेना 60 हजार मतांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भाजपने याठिकाणी राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली आहे. तर, बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपचे दिवंगत खासदार चिंतामन वनगा यांचा मुलगा व शिवसेनेचा उमेदवार श्रीनिवास वनगा हे पिछाडीवर आहेत.

पालघर लोकसभा पोटनिवडणुक शिवसेना आणि भाजपने याठिकाणी प्रतिष्ठेची लढाई बनविली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साम, दाम, दंड, भेद या ऑडिओ क्लिपमुळे ही निवडणूक चांगलीच गाजली होती. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही प्रचाराची राळ उडविली होती. 

Web Title: BJP ahead in Palghar loksabha bypoll ShivSena trails