

BJP and shinde Shivsena
ESakal
वाशी : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असून पक्षप्रवेश, शक्तीप्रदर्शन आणि अंतर्गत गणिते यामुळे निवडणूक रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील अनेक माजी नगरसेवकांनी शिवसेना शिंदे सेनेत प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणाची समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. यामुळे आगामी निवडणुकीत महापौरपदासाठी थेट लढत ही शिवसेना शिंदे सेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातच होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत चालले आहे.