

BJP and shinde Shivsena
ESakal
डोंबिवली : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास अवघा एक दिवस उरलेला असताना शिंदे गट आणि भाजपकडून अधिकृत उमेदवारांची यादी अद्याप जाहीर झालेली नाही. विशेष म्हणजे दोन्ही पक्षांमध्ये युती झाली आहे की नाही, याबाबतही नेतृत्वाकडून स्पष्ट भूमिका घेतली जात नसल्याने डोंबिवली व कल्याण परिसरात कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.