

BJP and Shinde shivsena group holding banners in Dombivli
ESakal
डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीचं राजकारण सध्या भाजप आणि शिंदे गटाभोवती फिरत आहे. या दोन पक्षांनी डोंबिवली पश्चिमेतील दोन्ही म्हात्रे यांना आपल्या गोटात दाखल करून घेतलं. मात्र या दोन्ही पक्षप्रवेशाच्या सोहळ्यांना अपेक्षित तो उत्साह आणि गाजावाजा लाभला नाही. परिणामी आता या दोन्ही पक्षांनी बॅनरबाजी करूनच “प्रवेशाचं शक्तीप्रदर्शन” दाखवायला सुरुवात केली आहे.