

Bhiwandi Municipal Corporation Mayor
ESakal
भिवंडी : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भिवंडी महापौरपदासाठी पुढाकार घेतला आहे. महापौरपदासाठी भाजपचे नारायण चौधरी यांचे नाव शहराध्यक्ष रवी सावंत यांना पत्राद्वारे चव्हाण यांनी कळविल्याने शहराध्यक्ष रवी सावंत यांनी महापौरपदासाठी नारायण चौधरी यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यांचे अभिनंदनाचे बॅनर समाजमाध्यमांवर प्रसारित होत असतानाच भाजपकडून महापौरपदासाठी इच्छुक असलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे पुतणे सुमीत पाटील समर्थकांनी सुमीत पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली असल्याचे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीआधीच भाजपमध्ये दोन गट पडल्याचे चित्र समोर आले आहे.