esakal | "डिस्को, पब ही आरोग्य केंद्र आहेत का?"; ठाकरेंना भाजपचा सवाल
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav-Thackeray-Ashish-Shelar

"डिस्को, पब ही आरोग्य केंद्र आहेत का?"; ठाकरेंना भाजपचा सवाल

sakal_logo
By
विराज भागवत

भाजपचे आमदार आशिष शेलार यांचा खोचक सवाल

मुंबई: एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी भाजपच्या आरोपांना उत्तर दिले. त्यावेळी ते म्हणाले की मी आता राज्याची गरज लक्षात घेऊन काम करत आहे. आरोग्य मंदिरे (Health Centers) बंद करून देवांची मंदिरे उघडू का? मुख्यमंत्र्यांच्या याच उत्तराला भाजपचे आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी प्रत्युत्तर दिलं. "राज्याला संबोधून मुख्यमंत्री म्हणाले की राज्याला मंदिरांची गरज आहे की आरोग्य मंदिरांची? आरोग्य केंद्र बंद करु आणि मंदिर उघडू का? मंदिर आणि आरोग्य मंदिर या दोन्ही बाबतीत मुख्यमंत्री असंवेदनशीलता का दाखवतायत हा आमच्या समोरचा प्रश्न आहे. राज्यात सुरु असलेली डिस्को (Disco), बार (Bar), पब (Pub) ही आरोग्य केंद्र आहेत का? असा आमचा सवाल आहे. डिस्को, बार, पबबाबत आपण काही बोलणार आहात का याचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे", असा सणसणीत टोला (Troll) लगावत त्यांनी मुख्यमंत्र्यांना काही खोचक सवाल केले.

हेही वाचा: दुसरे एटीएम फोडायच्या तयारीत असतानाच पोलिसांनी ठोकल्या बेड्या

"कट कमिशन आणि वाटाघाटी हा ठाकरे सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे का? कारण कोविड सेंटर, आयसोलेशन सेंटर, आरोग्य सुविधा, सँनिटझर वाटप, सँनिटायझेशन या सगळ्या पुरवठा धारकांमध्ये जी काही कट कमिशनची प्रकरणं समोर येतायत याच्यावर तुम्ही कधी भाष्य करणार आहात का? पब, रेस्टाँरंट, डिस्को, बार यांचे मालक यांच्याशी वाटाघाटी होतात आणि वाटाघाटी नंतर ते खुले होतात. कट कमिशन या धोरणाने तुम्ही निर्णय करता का ? एक्साईजची कमाई हवी म्हणुन दारुची दुकानं उघडी केलीत. मॉलमधल्या कामगारांच कारण सांगून मॉल उघडे केलेत, मग या मंदिरांच्या बाहेर नारळ, अगरबत्ती, धूप, फुलं विकणारे यांची उपासमार दिसत नाही? त्यांना जगण्याचा अधिकार नाही? मंदिरात किती लोक आले पाहिजेत या बद्दल कोरोनाचे नियम करुन बाहेर नारळ,अगरबत्ती, फुल विकणाऱ्यांचं पोट भरु शकत नाही का?", असा सवाल त्यांनी केला.

CM-Uddhav-Thackeray

CM-Uddhav-Thackeray

हेही वाचा: गोरेगाव : आरेतील रहिवाशांच्‍या शंकांचे निरसन

"या साऱ्या गरजू लोकांशी वाटाघाटी होऊ शकत नाहीत कारण आमचा तो गरीब माणूस या सरकारच्या अपेक्षा काय पूर्ण करणार? म्हणून त्यांना बंदी, त्यांच्यावर निर्बंध आणि डिस्को, पब, बारवाले वाटाघाटी करतील, आरोग्य केंद्रात कट कमिशन मिळेल या पद्धतीची भूमिका योग्य नाही. सध्या भक्त आणि देव यांची ताटातूट करण्याचं काम शिवसेना करतेय. हा करोना बंदीचा कार्यक्रम नाही तर हे देऊळ बंदीचं शिवसेनेचं अभियान आहे. माझं घर माझा बाप्पा या मोहिमबद्दल बोलायचं तर हे सर्व प्रकार म्हणजे शिवसेना हिंदुत्व आणि हिंदु सणांविरोधी असल्याचं प्रतिक आहेत. काळजी घ्या, पण आपला उत्सव साजरा करा असं का म्हणता येत नाही. केवळ सत्तेच्या मोहापाटी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेला वसा यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नादाला लागून सोडला आहे" अशी टीकाही त्यांनी केली.

loading image
go to top