निलंबित 12 आमदारांना यापुढे विधानभवनात प्रवेश मिळावा; शेलार यांनी लिहिलं पत्र |Ashish Shelar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ashish shelar
निलंबित 12 आमदारांना यापुढे विधानभवनात प्रवेश मिळावा; शेलार यांनी लिहिलं पत्र

निलंबित 12 आमदारांना यापुढे विधानभवनात प्रवेश मिळावा; शेलार यांनी लिहिलं पत्र

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेने भाजपाच्या 12 आमदारांचे केलेले एक वर्षांचे निलंबन (twelve mla suspension) हे सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) अवैध, घटनाबाह्य व अतार्किक ठरवून रद्द केले असल्याचे विधानभवन सचिवांना (vidhan bhavan secretary) पत्र लिहून भाजपा आमदार अॅड आशिष शेलार (Ashish shelar) यांनी अवगत केले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार यापुढे सदर आमदारांना विधानभवनात प्रवेश खुला झाल्याकडेही सचिवांचे त्यांनी लक्ष वेधले आहे.

हेही वाचा: 'वरणभात लोणचं....', ७ फेब्रुवारीला न्यायालय देणार निकाल

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपाच्या 12 आमदारांना एक वर्षासाठी निलंबित केल्याच्या विरोधात 12 आमदारांतर्फे आमदार शेलार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील निकाल 28 जानेवारीला दिला असून सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हे निलंबन अवैध ठरवून रद्द केले आहे.

आज याबाबत 12 आमदारांच्या वतीने शेलार यांनी विधानसभा सचिवांना पत्र लिहून या याचिकेत न्यायालयाने दिलेल्या आदेशाची सविस्तर कायदेशीर माहिती सचिवांना अवगत केली असून सोबत निवाड्यांची प्रतही जोडली आहे. न्यायालयाने निलंबन रद्द केल्यामुळे यापुढे विधिमंडळाच्या मुंबई आणि नागपूर येथील विधानभवन परिसरात प्रवेशाचा आमचा मार्ग मोकळा केला आहे, याकडे विधानसभा सचिवालयाचे लक्ष वेधले आहे.

Web Title: Bjp Ashish Shelar Writes A Letter To Vidhan Bhavan Secretary For Allowing Suspended Twelve Mla In Vidhan Bhavan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top