टिपू सुलतानच्या नावाला विरोध; भाजप, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक

मालाड येथील क्रीडा संकुलाला टिपू सुलतान यांचं नाव देण्यात येणार असल्याचं या आंदोलकांचं म्हणणं आहे.
Malad : Oppose to name of Tipu Sultan. Bajarang Dal, BJP, VHP
Malad : Oppose to name of Tipu Sultan. Bajarang Dal, BJP, VHP

मुंबई : मालाड येथील क्रीडा संकुलाला टिपू सुलतान (Tipu Sultan) यांचं नावावरुन देण्यावरुन भाजप, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या आंदोलक कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला यावेळी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन परिसर मोकळा करण्याचा प्रयत्न केला. या भागात नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आलं आहे. (BJP Bajrang Dal Vishwa Hindu Parishad activists are aggressive oppose to name of Tipu Sultan at Malad)

Malad : Oppose to name of Tipu Sultan. Bajarang Dal, BJP, VHP
गोळीबारानंतर ट्रेन जाळली... बिहारमध्ये रेल्वे भरतीचा वाद पेटला

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते काही वेळातच या क्रिडा संकुलाचा टिपू सुलतान क्रिडा संकुल असा नामकरण कार्यक्रम पार पडणार असल्याचं या आंदोलकांकडून सांगण्यात येत आहे. पण तत्पूर्वीच या ठिकाणी भाजप, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी विरोध आंदोलन सुरु केलं आहे. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजीही करण्यात आली.

मैदानाला आधीच टिपू सुलतानचं नाव - अस्लम शेख

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले, "पहिल्यांदा तिथं कार्यक्रम काय आहे, ते पाहा. त्या मैदानात विकास काम सुरु आहे तिथं नामकरणाचा कार्यक्रम आलाच कुठे? ज्या ठिकाणी खराब, घाणेरडी जागा होती ती व्यवस्थित करुन त्या जागेवर क्रीडा संकुल उभारण्यात आला आहे. जे मैदान गेल्या पंधरा वर्षांपासून टिपू सुलतान यांच्या नावानं आहे, ज्याचं मी उद्घाटन करतो आहे. पण माझं काम लोकांपर्यंत पोहोचूच नये म्हणून हा सगळा गोंधळ घतला जात आहे. सत्तर वर्षात कधी टिपू सुलनातच्या नावाला विरोध झाला नाही मग आत्ताच नावांवरुन का गोंधळ सुरु झाला आहे? उलट यापूर्वी भाजपच्याच नगरसेवकांनी आणि नेत्यांनी मुंबईतल्या रस्त्याला टिपू सुलतान यांचं नाव दिलं आहे"

भाजपला मुंबई महापालिकेची स्वप्न पडायला लागली आहेत - कायंदे

आंदोलकांकडून कांगावा सुरु आहे. कर्नाटकात टिपू सुलतानचा पुतळा आहे तो तिथल्या भाजप सरकारनं उतरुन दाखवावा. आजच्या प्रजासत्ताक दिनी आपण काय करतोय याचंही भान यांना उरलेलं नाही. मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून हा वाद निर्माण केला जात आहे. भाजपला आता मुंबईवर सत्ता गाजवण्याची स्वप्न पडायला लागली आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com