
BJP aggressive on ambedkar janhitwadi sanghatana
ESakal
डोंबिवली : आगामी पालिका निवडणूकीच्या तोंडावर पक्ष फोडाफोडीच्या राजकारणाला जोर आला आहे. त्यासोबतच पक्षाची ताकद दाखवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी आपली ताकद दाखवित राजकीय वातावरण तंग करण्यास सुरुवात केली आहे. साडी प्रकरणावरुन भाजपा आणि कॉंग्रेस यांच्यातील वातावरण गरम असतानाच आता आंबेडकर जनहितवादी संघटना आणि भाजपा यांच्यात रविवारी वाद झाला. सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विरोधात सभा आयोजित केल्याने भाजपा आक्रमक झाली. भर पावसात डोंबिवलीतील वातावरण तापत असतानाच पोलिसांनी हस्तक्षेप करत वातावरण शांत केले.