esakal | बापरे ! भाजपच्या 'या' खासदाराला कोरोनाची लागण, घरातील एकूण ८ जणही आहेत पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

बापरे ! भाजपच्या 'या' खासदाराला कोरोनाची लागण, घरातील एकूण ८ जणही आहेत पॉझिटिव्ह

भाजपचे भिवंडी लोकसभा मतदार संघातील खासदार कपिल पाटील यांना कोरोनाची लागण झालीये. महत्त्वाची आणि धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या पत्नी, मुलगा, मुलगी आणि एकूण आठ जणांना कोरोनाची लागण झालीये.

बापरे ! भाजपच्या 'या' खासदाराला कोरोनाची लागण, घरातील एकूण ८ जणही आहेत पॉझिटिव्ह

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : कोरोनाचा वाढता संसर्ग सर्वांसाठीच डोकेदुखी ठरतोय. आपल्या जीवाची बाजी लावत डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी सोबतच पोलिस याना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाल्याचं आपण बातम्यांमधून वाचलंय पाहिलंय. मात्र आता नेते नेते मंडळी देखील कोरोनाच्या विळख्यात आडकताना पाहायला मिळतायत. खरंतर नेता म्हंटलं की अनेकांच्या भेटीगाठी, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम घराबाहेर पडून काम करणं आलंच. अशात आता कोरोना कोरोनाग्रस्त नेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतेय.

मोठी बातमी - असा हवेतूनही पसरू शकतो कोरोना, WHO ने जारी केली नवीन नियमावली

याच पार्श्वभूमीवर मुंबईतून एक मोठी बातमी समोर येतेय. भाजपचे भिवंडी लोकसभा मतदार संघातील खासदार कपिल पाटील यांना कोरोनाची लागण झालीये. महत्त्वाची आणि धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या पत्नी, मुलगा, मुलगी आणि एकूण आठ जणांना कोरोनाची लागण झालीये. मिळालेल्या माहितीनुसार कपिल पाटील यांच्या पत्नी यांना सर्वप्रथम कोरोनाची लागण झाल्याचं समजतंय. त्यानंतर स्वतः कपिल पाटील, त्यांचा मुलगा, सून आणि मुलीसोबत एक पुतण्या आणि दोन सुना अशा एकूण आठ जणांना कोरोनाची लागण झालीये. कपिल पाटील यांना सौम्य लक्षणं असल्याने ते त्यांच्या राहत्या घरीच होम क्वारंटाईन झाले आहेत. त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांवर देखील कोरोना उपचार सुरु झालेत. 

मोठी बातमी - विकास दुबेच्या एन्काउंटरवर एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा म्हणतात, हा एन्काउंटर तर...

कोरोनाच्या संवेदनशील काळात जनतेशी संपर्कात राहणं नेत्यांसाठी अनिवार्य असतं. आपल्या मतदार संघातील नागरिकांना काय हवं काय नाही याबाबत नेत्यांकडून कायम काळजी घेतली जाते. याच कारणाने नेते मंडळींना आता कोरोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळतंय. सर्वात आधी राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र, राष्ट्रवादीचेचे आणखी एक नेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण, ठाण्यातील राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे, पुण्याचे भाजपचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झालीये. दुर्दैवाने काही नेत्यांनी कोरोनामुळे आपले प्राणही गमावलाय.

BJP bhiwandi MP kapil patil detected corona positive total 8 family members are positive

loading image