esakal | असा हवेतूनही पसरू शकतो कोरोना, WHO ने जारी केली नवीन नियमावली
sakal

बोलून बातमी शोधा

असा हवेतूनही पसरू शकतो कोरोना, WHO ने जारी केली नवीन नियमावली

काही दिवसांपूर्वी एका वैज्ञानिकांच्या गटाने कोरोनाचा संसर्ग हवेद्वारे ही पसरू शकतो असे सांगितले होते. 

असा हवेतूनही पसरू शकतो कोरोना, WHO ने जारी केली नवीन नियमावली

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई - काही दिवसांपूर्वी एका वैज्ञानिकांच्या गटाने कोरोनाचा संसर्ग हवेद्वारे ही पसरू शकतो असे सांगितले होते. कोरोनाचा संसर्ग हवेद्वारे होतो असा दावा 32 देशातील शास्त्रज्ञांनी केला आहे. त्यावर जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) कोरोनाचा संसर्ग हवेद्वारे होऊ शकतो, अशी सहमती देत यासंदर्भात ठोस पुराव्यांची आवश्यकता आहे, असे नमूद केले आहे. दरम्यान, डब्ल्युएचओने यासंदर्भात काही नवीन सुचना जारी केल्या आहेत. त्यामध्ये काही महत्वाच्या सुचना अशा आहेत, ज्या कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये, यासाठी नक्कीच उपयोगी ठरतात. 

काही विशेष स्थान आणि जागांवरुन कोरोना व्हायरसचा संसर्ग हा हवेतून होतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. यामध्ये गर्दीच्या ठिकाणांवरुन एरोसोल ट्रांसमिशनसोबतच हॉलमधून, रेस्टॉरंट आणि फिटनेस क्लासेसमध्ये सुद्धा कोरोना व्हायरस हवेतून पसरु शकतो, अशी शक्यताही वर्तवली आहे.

BIG NEWS विकास दुबेच्या एन्काउंटरवर एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा म्हणतात, हा एन्काउंटर तर...

त्याचबरोबर बंद खोलीत अधिक काळासाठी बाधित व्यक्ती राहिल्यासही कोरोना व्हायरसचा संसर्ग त्या ठिकाणी असलेल्या हवेतून पसरण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे लोकांनीही अशा ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. दरम्यान यासंदर्भात WHO  विविध देशातील शास्त्रज्ञांसोबत चर्चा करत आहे, तसेच हवेतून कोरोना व्हायरसचा संसर्ग आणखी कशा प्रकारे आणि कुठल्या ठिकाणांहून होण्याची शक्यता आहे, यावर अभ्यास करत आहे. 

WHO ने याआधीच कोरोना व्हायरस बाधित रुग्णांच्या शिंकण्यातून, खोकल्यातून आणि बोलत्यावेळी लाळेच्या माध्यमातून इतरांनाही या व्हायरसची लागण होते असे स्पष्ट केले होते. तसेच बाधित रुग्णांपासून हाताने हाताळलेल्या वस्तूंवर जसे टेबल, खुर्ची, उपकरणास आपण हाताळले त्यातूनही कोरोना व्हायरसची लागण होते. त्यामुळे अशा वस्तूंचे सतत सॅनटाईजेशन होणे आवश्यक आहे. त्यामुळे, हात स्वच्छ करणे, सतत फेस मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे आवश्यक आहे. 

BIG NEWS फुटपाथवर झोपलेला 'तो' तरुण कोविड हॉस्पिटलमधून पळाला होतो, पुन्हा दवाखान्यात नेल्यावर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
 

दरम्यान, भारताच्या काऊन्सिल फाॅर सायंटिफीक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च (सीएसआयआर) आणि सेंटर फाॅर सेल्युअर अँड माॅलिक्युलर बायोलाॅजी (सीसीएमबी) मधील संशोधकांच्या मते ताज्या संशोधनाचा असाही अर्थ असू शकतो की, कोरोनाचे विषाणू काही काळासाठी हवेमध्ये तरंगतात. याचा अर्थ असा नाही की, ते सर्वत्र हवेद्वारे पसरतील आणि सर्वांना संक्रमित करतील. त्यामुळे, लोकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. 

सीएसआयआर आणि सीसीएमबीचे संचालक राकेश मिश्रा म्हणाले की, हा चांगला अभ्यास आहे. त्या आधारे जागतिक आरोग्य संघटनेला सांगितले आहे की, कोरोनाचे विषाणू काही काळासाठी हवेमध्ये राहू शकतात. याचा अर्थ असा की, तो पाच मायक्राॅनपेक्षा सुष्म तुषारांत प्रवास करु शकतो. म्हणजेच एखाद्या थेंबापेक्षा तो हवेमध्ये जास्त काळ तरंगू शकतो. त्यामुळे, लोकांनी गर्दी टाळावी, सावधगिरी बाळगली पाहिजे. कोरा विषाणूबाबत फारच कमी माहिती आहे आणि त्याबद्दलची माहिती लवकरच दिली जाईल.

( संपादन - सुमित बागुल )

read WHOs revised guidelines for corona airborne spread read trending news