नवी मुंबई : ठाणे जिल्ह्यात वनमंत्री गणेश नाईक यांची निवडणूक प्रभारी म्हणून निवड करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपने थेट आव्हान दिले आहे. तर नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रमुख म्हणून माजी खासदार संजीव नाईक यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे भाजपने शिंदेंविरोधात थेट रणशिंग फुंकल्याचे चित्र आहे.