एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा अडचणीत; नालासोपाऱ्यावर भाजपचा दावा

Nalasopara
Nalasopara

विरार : लोकसभा निवडणुकीत सेनेचा बालहट्ट पुरविणाऱ्या भाजप नेतृत्वाने या वेळी सेनेला नालासोपारा मतदार संघ सोडू नये, अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी  कार्यकर्त्या मेळाव्यात एकमुखाने केल्याने मोठ्या धड्याक्यात एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचे स्वागत करणाऱ्या सेने पुढे आणि शर्मा पुढे अडचणी उभ्या राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

शिवसेनेने परस्पर नालासोपारा विधान सभेसाठी प्रदीप शर्मा यांची उमेदवारी  भाजपच्या कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केल्याने नालासोपारा मतदार संघातील भाजपचे कार्यकर्ते नाराज झाले असून त्यांनी या विरोधात काल नालासोपारा पूर्व येथील शादी डॉट कॉम मैदानावर एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी तसेच पदाधिकार्यांनी आपली मते मांडली. अनेक वर्षांपासून भाजप ही लोकसभा आणि विधानसभा यांचे नेतृत्व करत आहे. तरी वरिष्ठांनी युतीधर्माचे पालन करून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतशिवसेनेचा बालहट्ट पुरविताना पालघर लोकसभा सीट उमेदवार सकट शिवसेनेला दिली.

उमेदवारी दिल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना उमेदवारास निवडून आणले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत तुटपुंजे कार्यकर्ते असतानाही भाजपला याठिकाणी सेने पेक्षा २० हजार मते जास्त मिळाली असताना आता  १३२ नालासोपारा व १३३ वसई या दोन्ही जागा शिवसेनेसाठी सोडत आहेत असे समजते आणि शिवसेनेने परस्पर वसई आणि नालासोपारासाठी आपापले उमेदवारही जाहीर केल्याने त्यात भर पडत आहे. असे झाले तरं वसई तालुक्यातून भाजपचे अस्तित्वच संपणार असून त्याला कार्यकर्ते म्हणून आमचा विरोध असल्याचा ठराव या मेळाव्यात घेण्यात आला म्हणूनच कुठल्याही परिस्थितीत ही १३२ नालासोपारा विधानसभा भाजपलाच मिळाली पाहिजे. कार्यकर्त्यांनी घेतलेल्या ह्या निर्णयामुळे एन्काउंटर स्पेशालिस्ट सेनेचे उमेदवार प्रदीप शारमा यांच्या अडचणीत वाढ होणार असून युतीत हि जागक कोणाला मिळते हे पाहणे मजेशिरर ठरणार आहे. 

या कार्यक्रमात राज वर्मा, हरेंद्र  पाटील, राजेंद्र सिंघ ठाकूर, अजित अस्थाना, संजोग यंदे, संजय पांडे, श्रीमती आम्रपाली साल्वे, गोपीनाथ नागरगोजे, प्रदीप यादव, विजयप्रकाश दुबे, शरद सुर्वे, माझी नगरसेवक देवीदास खोत,भाजपचे महामंत्री मनोज बारोट  आणि असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com