

BJP And Congress Form Alliance In Ambarnath
Esakal
अंबरनाथ, ता. ६ (वार्ताहर) : नगर परिषदेवर भाजपचा नगराध्यक्ष निवडून आणल्यानंतर शिवसेना शिंदे गटाला पूर्णपणे सत्तेपासून दूर ठेवण्याची रणनीती आखली जात आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्षाने अंबरनाथ विकास आघाडीच्या नावाने काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे. ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात पहिल्यांदाच भाजप-काँग्रेस युतीचा नवीन पॅटर्न यानिमित्ताने पाहायला मिळणार आहे; मात्र ही युती अभद्र असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाने केला असून आता विरोधी पक्षाच्या बाकावर बसण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे गेली २५ वर्षे अंबरनाथमध्ये असलेली शिवसेनेची सत्ता यंदा संपूर्णपणे संपुष्टात येणार आहे.