भाजपच्या नगरसेवकावर खंडणीचा गुन्हा दाखल (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

खारघर (मुंबई) - हॉटेल व्यावसायिकाने पैसे दिले नाही म्हणून खारघर मधील एका भाजप नगरसेवसह आठ ते दहा व्यक्तीने हॉटेल मालक आणि कामगारांना मारहाण केल्या प्रकरणी त्यांचा  विरोधात घातक हत्याराने मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

खारघर सेक्टर पस्तिसमध्ये राहणारे इम्तियाज निसार अहमद (41) आणि त्याचा साथीदारानी जुलै महिन्यात खारघर सेक्टर चारमध्ये बावर्ची नावाचे हॉटेल सुरु केले. हॉटेल सुरु झाल्यावर एक अनोळखी इसम येवून व्यवसाय करावयाचे असेल तर महिन्याला पन्नास हजार रुपये द्यावे लागतील अशी धमकी देवून गेला. सांगितले. इम्तियाज यांनी नियमानुसार हॉटेल सुरु केल्याने या घटनेकडे दुर्लक्ष केले. 

दरम्यान, शनिवारी नगरसेवक शत्रुघ्न काकडे हे आठ ते दहा साथीदारांनी दर महिन्याला पैसे दिले नाहीस तर जिवंत ठेवणार नाही असे सांगून त्यांना व त्यांचा कामगारांना मारहाण केल्याचा गुन्हा खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: BJP corporator filed for ransom