Property Tax Hike: २,६०० रुपयांचा कर थेट २७ हजारांवर, महासभेत कर आकारणीचा मुद्दा पेटला; पाणीप्रश्नावर विशेष सभेची मागणी

KDMC: मालमत्ता करवाढीवरून भाजप नगरसेवक मोरेश्वर भोईर यांनी प्रशासनावर टीका केल आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पहिल्याच महासभेत कर आकारणीचा मुद्दा पेटला आहे.
Property Tax

Property Tax

ESakal

Updated on

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नवनिर्वाचित सभागृहाची पहिलीच महासभा सोमवारी (ता. १६) वादाच्या भोवऱ्यात सापडली. २७ गावांमधील मालमत्ता करात झालेली १० पट वाढ आणि प्रशासनाचे अन्यायकारक कर धोरण यावरून भाजप नगरसेवक मोरेश्वर भोईर यांनी प्रशासनाला धारेवर धरले. ‘‘ग्रामपंचायत काळात ज्या घराचा कर २,६०० रुपये होता, तो आता थेट २७ हजार रुपये झाला आहे,’’ असा स्वानुभव सांगत त्यांनी या भागातील नागरिकांच्या संतप्त भावना सभागृहात मांडल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com