
स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याविरोधात भाजपकडून घोषणाबाजी करण्यात आली.
BMC सभागृहात भाजप नगरसेवकांनी घातला गोंधळ
मुंबई : सध्या भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) यांच्यात चांगलीच जुंपल्याचं पहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेची (Mumbai Municipal Corporation) मुदत संपत असताना शेवटच्या दिवशीसुद्धा भाजप नगरसेवकांनी (BJP Corporator) महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात गोंधळ घातलाय. कुठल्या प्रकारची चर्चा न करता शेवटच्या दिवशी प्रस्ताव मंजूर केल्यानं सहा हजार कोटींचा भ्रष्टाचार शिवसेना करत असल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी केलाय.
मुंबई महानगरपालिकेची आज मुदत संपत आहे. तत्पूर्वी आज शेवटची स्थायी समितीची बैठक थोड्या वेळापूर्वीच पार पडली. या बैठकीत जवळपास 360 प्रस्ताव मांडण्यात आले. त्यातील बहुतांश प्रस्ताव मंजूरही करण्यात आले आहेत. दरम्यान, भाजप नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर करत असताना हरकतीचा मुद्दा मांडला. मात्र, यावरुन महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजपनं गोंधळ घालायला सुरुवात केली.
हेही वाचा: 'फडणवीसांनी नवाब मलिकांवर त्याचवेळी का कारवाई केली नाही?'
महानगरपालिकेत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. कुठल्याही प्रकारची चर्चा न करता हे सर्व प्रस्ताव मंजूर करून तीनशे सहा हजार कोटींचा भ्रष्टाचार शिवसेना करत असल्याचा आरोप भाजपनं केलाय. याविरोधात भाजपकडून मुंबई महापालिका आयुक्तांच्या कार्यालया बाहेरसुद्धा फलक घेऊन आंदोलन करण्यात आले.
Web Title: Bjp Corporators Staged Agitation In Mumbai Municipal Corporation Against Shiv Sena Corruption
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..