'सामना' बंद ठेवण्याची भाजपची मागणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

आचारसंहितेचा हा भंग असल्याचा दावा पत्रकात केला आहे. त्यामुळे 16, 20 व 21 या तारखांना "सामना'चे प्रकाशन बंद करावे. तसेच आचारसंहिता भंग केल्याबद्दल वृत्तपत्र आणि संपादकांवर कारवाई करावी.

मुंबई - मतदानापूर्वी 48 तास राजकीय पक्षांना प्रचार करण्यास बंदी असते. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या "सामना'तून मात्र प्रचार सुरूच असतो. त्याचा निवडणूक खर्चही दाखवला जातो की नाही, याची माहिती नसते. हे लक्षात घेता 16, 20 व 21 या तारखांना "सामना' बंद ठेवण्याची मागणी भाजपने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

पक्ष प्रवक्‍त्यांनी एका पत्रकाद्वारे ही मागणी केली आहे. गुरुवारी (ता. 16) 15 जिल्हा परिषदांसाठी मतदान होत आहे. त्याचा प्रचार 14 फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजता संपला. "सामना'तून (औरंगाबाद आवृत्ती) बुधवारी प्रचार करणारा अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आला आहे.

आचारसंहितेचा हा भंग असल्याचा दावा पत्रकात केला आहे. त्यामुळे 16, 20 व 21 या तारखांना "सामना'चे प्रकाशन बंद करावे. तसेच आचारसंहिता भंग केल्याबद्दल वृत्तपत्र आणि संपादकांवर कारवाई करावी. त्याचा खर्च उमेदवारांच्या खर्चात दाखवला जातो का, याची तपासणी करावी. अन्यथा संबंधितांवर कारवाई करावी, असेही या पत्रकात म्हटले आहे.

Web Title: bjp demands ban on samana newspaper