esakal | "आघाडीवाल्यांनो, तुमचं म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना"
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra-Fadnavis-Chandrakant-Patil

भाजपच्या देवेंद्र फडणवीसांचा तिन्ही पक्षांना सणसणीत टोला

"आघाडीवाल्यांनो, तुमचं म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना"

sakal_logo
By
विराज भागवत

राज्यात भाजपला पोटनिवडणुकीत यश मिळालं असलं तरी सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालमध्ये ममतादीदींच्या तृणमूल काँग्रेसने गड राखला. २००च्या पुढचा टप्पा गाठत राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूलने बहुमत मिळवलं. एकेकाळी एक आकडी संख्या असलेल्या भाजपने तेथे चांगली मुसंडी मारत नव्वदीच्या आसपास जागांवर विजय मिळवला. बंगालच्या आणि इतर राज्यांच्या निकालांवर भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मत व्यक्त केलं. "आम्हाला इतर राज्यात पण योग्य यश मिळालं आहे. बंगालमध्ये आम्हाला अपेक्षित जागा मिळाल्या नसल्या, तरी बऱ्याच जागा मिळाल्या. बंगाल कम्युनिस्ट आणि काँग्रेसमुक्त झालं. आता त्या ठिकाणी हळूहळू भगव्याचं राज्य होताना दिसत आहे. मात्र या निकालांवर काँग्रेसने विजय साजरा करणं म्हणजे 'बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना' अशी गत आहे", अशा खोचक शब्दात त्यांनी टीका केली.

हेही वाचा: "योग्य वेळी त्यांचा कार्यक्रम करू"; फडणवीसांचा थेट इशारा

"शिवसेनेचा बंगाल निवडणुकीत काहीच संबंध नाही. राष्ट्रवादीही आज हरलं तसंच काँग्रेसलाही फटका बसला. पण असं असलं तरी ममतादीदींच्या यशामुळे यांना इतका आनंद का झालाय? ज्या बंगालमध्ये भाजपचं अस्तित्व नव्हतं, तिथे आम्ही जागा वाढवल्या. सुवेंदू अधिकारी यांनी आपलं चॅलेंज खरं करून दाखवलं. ममता बॅनर्जींची मतदारसंघात दमछाक झाल्याचं स्पष्ट दिसलं. बंगालमध्ये भाजप आली नाही, म्हणून मोदी आणि शाह यांची लोकप्रियता कमी झाली, असं काही लोक म्हणतात. मग ते लोक इतर राज्यांचे काय विश्लेषण करणार?", असा सवाल फडणवीसांनी विरोधकांना केला.

हेही वाचा: 'देशाला सत्य कळायला हवं', अदर पुनावालाच्या आरोपांवर जितेंद्र आव्हाडांचे टि्वट

पंढरपुरातील निकालावरही फडणवीस यांनी मत व्यक्त केलं. "महाराष्ट्रातील जनता जिगरबाज आहे. त्यामुळेच त्यांनी भाजपला निवडलं आणि तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवला. पंढरपूरमध्ये मिळालेल्या विजयासाठी जनतेचे आभार. त्यांनी आम्हाला निवडलं. सत्तेचा तेथे खूप गैरवापर झाला. पैशाचा गैरवापर करण्यात आला. आमच्या टीमने खूप चांगलं काम केलं. भाजप एकत्रित काम करत होती. जनतेपर्यंत पोहोचून आम्ही जनतेची मत मिळवू शकलो", असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

loading image
go to top