esakal | "योग्य वेळी त्यांचा कार्यक्रम करू"; फडणवीसांचा थेट इशारा

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

पंढरपूरात आम्हाला पांडुरंगाचा आशीर्वाद मिळाला- देवेंद्र फडणवीस

"योग्य वेळी त्यांचा कार्यक्रम करू"; फडणवीसांचा थेट इशारा
sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे यांनी दमदार विजय मिळवला. केंद्रावर कडेकोट पोलिस बंदोबस्तात मतमोजणीला सुरूवात झाली. सकाळी आठ वाजता सर्वप्रथम पोस्टल मतांची मोजणी सुरू झाली. त्यानंतर इव्हीएमच्या मतांची मोजणी झाली. या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचा मृत्यू झाल्याने तेथे पोटनिवडणूक घेण्यात आली. या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांना एकूण 1 लाख 9 हजार 450 तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना 1 लाख 5 हजार 717 मते मिळाली. पंढरपूरमधील विजयानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला सूचक इशारा दिला.

हेही वाचा: 'देशाला सत्य कळायला हवं', अदर पुनावालाच्या आरोपांवर जितेंद्र आव्हाडांचे टि्वट

"राज्यातील पोटनिवडणूक त्यांना जिंकता आली नाही. पण तरीही सध्या महाविकास आघाडी खूप खुश आहे. योग्य वेळी त्यांचा योग्य तो कार्यक्रम करू, पण आता कोरोनाशी लढायचं आहे", असा सूचक इशारा फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला. "पंढरपूरमध्ये मिळालेल्या विजयासाठी जनतेचे आभार. त्यांनी आम्हाला निवडले. सत्तेचा तेथे खूप गैरवापर झाला. पैशाचा गैरवापर करण्यात आला. आमच्या टीमने खूप चांगलं काम केलं. भाजप एकत्रित काम करत होती. जनतेपर्यंत पोहोचून आम्ही जनतेची मत मिळवू शकलो. या सरकारने कोरोना काळात कोणाला मदत केली नाही. बाराबलुतेदारांमध्ये नाराजी होती. गरजू कुटुंबांची वीज तोडली गेली. त्यामुळे लोक नाराज होते. आम्हाला निवडलं. आम्हाला पंढरपुरात पांडुरंगाचा आशीर्वाद आम्हाला मिळाला", अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विजयानंतर प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा: "मग तेव्हा काय चपात्या भाजत होतात काय?"; चंद्रकांतदादा बरसले

दरम्यान, सकाळी मतमोजणी सुरू झाली. त्यावेळी भगीरथ भालके पुढे होते. पण अवघ्या काहीच फेऱ्यांमध्ये भाजपच्या समाधान आवताडेंनी भालके यांनी मागे टाकले. सलग अनेक फेऱ्यांमध्ये मतांची आघाडी घेतलेले भाजपचे समाधान आवताडे यांनी शेवटच्या फेरीपर्यंत मतांची आघाडी कायम राखली. भाजपच्या समाधाना आवताडेंनी एकूण 1 लाख 9 हजार 450 मतं मिळवली तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना 1 लाख 5 हजार 717 मतं मिळाली.

हेही वाचा: "अशा लोकांना हुतात्मा चौकात दिवसभर उन्हात बसवा"

मंगळवेढा पोटनिवडणुकीत आमचा थोडक्यात पराभव झाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. महाराष्ट्रातील पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत आम्ही अपयशी ठरलो, अशी कबुली त्यांनी दिली. महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी चांगली मदत केली, मात्र दोन तालुक्यात संवाद साधता न आल्याने आणि दोन तालुक्‍यातील सर्वांना सोबत घेऊन जाण्यात आम्हाला अपयश आले आणि आमचा त्या ठिकाणी थोडक्यात पराभव झाला, असे जयंत पाटील म्हणाले. या निवडणुकीसाठी अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली होती. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे आभार असेही जयंत पाटील म्हणाले.