esakal | 'देशाला सत्य कळायला हवं', अदर पुनावालाच्या आरोपांवर जितेंद्र आव्हाडांचे टि्वट

बोलून बातमी शोधा

अदर पुनावाला-जितेंद्र आव्हाड

'देशाला सत्य कळायला हवं', अदर पुनावालाच्या आरोपांवर जितेंद्र आव्हाडांचे टि्वट

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पुनावाला यांनी लंडनच्या 'द टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत खळबळजनक आरोप केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, मला धमक्या मिळत आहेत, आणि सत्य बोललो तर माझे शीर कापले जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. अदर पुनावाल यांच्या या विधानाचे पुढच्या काही दिवसात गंभीर राजकीय पडसाद उमटू शकतात. त्याची तशी सुरुवातही झाली आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्या संदर्भात टि्वट केले आहे.

"अदर पुनावाला यांनी लंडनधल्या 'द टाईम्स'ला मुलाखत दिली आहे. त्यामुळे खरं-खोटं तपासण्याची गरज आहे. भारतात कोरोना प्रतिबंधक लसींच उत्पादन करणारा अदर पुनावाला लंडनला का निघून गेला? ते भारतातल्या प्रत्येक नागरीकाला कळायलाच हवं. ज्या अर्थी तो म्हणतोय की, शीर कापलं जाईल, त्या अर्थी प्रकरण गंभीर आहे, याचा शोध घेतला पाहिजे" असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

हेही वाचा: मुंबईकरांनो लक्ष द्या! लॉकडाउन गाईडलाईन्सचा 'हा' मेसेज करू नका फॉरवर्ड

आपल्या देशातील श्रीमंत आणि मोठ्या मोठ्या राजकीय हस्थींकडून धमक्या येत असल्याचे अदर पूनावाला यांनी म्हटले आहे. त्या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, "या राज्यातला मंत्रालयातला शिपाई का असेना, त्याला जगण्याचे स्वातंत्र्य आहे. त्याचा तो मुलभूत अधिकार आहे. त्यावर कोणी गदा आणत असेल, तर योग्य कारवाई होईल."

हेही वाचा: मुंबईत कोरोना रुग्ण संख्येत मोठी घट होतेय, पण...

"आजच्या घडीला भारतातला सर्वात महत्त्वाचा व्यक्ती कोण असेल, तर तो अदर पूनावाला आहे. कोट्यवधी लोकांचे जीव त्याच्या हातात आहेत. तो लसींचे उत्पादन पुण्यातून लंडनला हलवणार असेल तरी ती नामुष्की आहे" असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

मुलाखतीत नेमकं काय म्हटलं आहे अदर पुनावालाने

भारताची प्रमुख लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आता इतर देशांमध्ये लस उत्पादन घेण्याचा विचार करत आहे. लशीच्या पुरवठ्याबाबतच्या वेळेचं आश्वासन पाळण्यात अडचण येऊ लागल्यानं 'सीरम' हे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी दिली आहे. सध्या सीरम इस्टिट्यूटचे अदर पुनावाला लंडनला निघून गेले आहेत. मात्र, 'द टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की मला धमक्या मिळत आहेत, आणि सत्य बोललो तर माझे शीर कापले जाईल, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली आहे.