पनवेल पालिकेवर भाजपचेच वर्चस्व; स्थायी समिती सभापतीपदी संतोष शेट्टी

दीपक घरत
Wednesday, 28 October 2020

पनवेल पालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत नगरसेवक संतोष शेट्टी यांची बिनविरोध निवड करण्यात झाली.

पनवेल -  पालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत नगरसेवक संतोष शेट्टी यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून महिला व बालकल्याण सभापतीपदी नगरसेविका मोनिका महानवर यांची देखील बिनविरोध निवड करण्यात आली असून अ आणी ब प्रभाग समिती सभापती पदा करता शेकापने उमेदवार दिल्याने झालेल्या निवडणुकीत भाजपा नगरसेवकांनी शेकापच्या उमेदवारांचा पराभव करत क व ड आशा चारही प्रभाग समित्यांवर भाजपने आपला झेंडा फडकावला आहे. पनवेल महानगरपालिकेच्या अ,ब,क,ड या चारही विषय समितीच्या सभापतींचा कार्यकाळ दि.15 एप्रिल रोजी संपुष्ठात आला होता.

दिवाळीनिमित्त एसटीच्या दररोज एक हजार जादा फेऱ्या; परिवहन मंत्र्यांची माहिती

कोविडमुळे चारही सभापतींना मुदतवाढ मिळाल्याने या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.या निवडणुकीमध्ये सत्तधारी भाजपतर्फे स्थायी समिती सभापती पदासाठी नगरसेवक संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापती पदासाठी नगरसेविका मोनिका महानवर, तर प्रभाग समिती अ साठी अनिता पाटील, प्रभाग समित ब साठी नगरसेवक समिर ठाकूर, प्रभाग समिती क साठी हेमलता म्हात्रे आणि प्रभाग समिती ड साठी नगरसेविका सुशील घरत यांनी आपले  उमेदवारी अर्ज महापालिकेचे सचिव तिलकराज खापर्डे यांच्याकडे  सोमवारी सादर केले होते.

शेकाप तर्फे प्रभाग अ साठी  विष्णु जोशी व प्रभाग ब साठी गोपाळ  भगत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.बुधवार 28 ऑक्टोबर रोजी  घेण्यात आलेल्या निवडणूकीत स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपचे  नगरसेवक संतोष  शेट्टी, महिला व बालकल्याण सभापती पदासाठी भाजपाच्या  नगरसेविका मोनिका महानवर यांची बिन विरोध निवड झाली तर प्रभाग समितीच्या सभापतीपदी  प्रभाग क हेमलता म्हात्रे आणि प्रभाग ड सभापतीपदी  सुशील घरत यांची बिन विरोध निवड झाली . प्रभाग अ मध्ये भाजपच्या  अनीता पाटील यांनी शेकापक्षाचे उमेदवार विष्णु जोशी यांचा 13 विरुध्द 10 असा पराभव केला तर प्रभाग ब मध्ये भाजपच्या समीर ठाकुर यांनी शेकापक्षाचे गोपाळ भगत यांचा 14 विरुध्द 9 असा पराभव केला. 

कळंबोलीमध्ये पिंपळाच्या झाडावर विषप्रयोग? स्थानिकांनी व्यक्त केला संशय - 

दोन्ही पक्षांनी बजावले होते व्हीप 
शेकाप मधील काही नगरसेवकांनी भाजपा मध्ये प्रवेश केला असला तरी तांत्रिक दृष्ट्या ते शेकापतच असल्याने तसेच भाजपा च्या काही नगरसेवकांमध्ये देखील नाराजी असल्याची चर्चा असल्याने दोन्ही पक्षांनी मते फुटण्याच्या भीतीने आपापल्या नगरसेवकांना व्हीप जारी केले होते.

 

आमदार प्रशांत ठाकुर यांच्या विकासाच्या मार्गावरून चालताना त्यांनी केलेला विकास लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतांना पनवेल महापालिका करोंना मुक्त करणार -
- संतोष शेट्टी,
 स्थायी समिती सभापती

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP dominates Panvel Municipality Santosh Shetty as Standing Committee Chairman