esakal | कळंबोलीमध्ये पिंपळाच्या झाडावर विषप्रयोग? स्थानिकांनी व्यक्त केला संशय
sakal

बोलून बातमी शोधा

झाड

शीव-पनवेल महामार्गावर कळंबोली येथील शिवसेना शाखेसमोर डेरेदार पिंपळ वृक्ष नष्ट करण्यासाठी त्यावर विषप्रयोग केल्याचा आरोप स्थानिक लोकांनी केला आहे. या वृक्षाला चार मोठी छिद्र पाडून त्याद्वारे वृक्षामध्ये चिकट द्रव्य सोडण्यात आल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले आहे.

कळंबोलीमध्ये पिंपळाच्या झाडावर विषप्रयोग? स्थानिकांनी व्यक्त केला संशय

sakal_logo
By
दीपक घरत

पनवेल  ः शीव-पनवेल महामार्गावर कळंबोली येथील शिवसेना शाखेसमोर डेरेदार पिंपळ वृक्ष नष्ट करण्यासाठी त्यावर विषप्रयोग केल्याचा आरोप स्थानिक लोकांनी केला आहे. या वृक्षाला चार मोठी छिद्र पाडून त्याद्वारे वृक्षामध्ये चिकट द्रव्य सोडण्यात आल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले आहे. दरम्यान एका जाहिरात कंपनीचा फलक या वृक्षामुळे दिसत नसल्याने जाहिरात फलक लावणाऱ्यांकडून हा विषप्रयोग करण्यात आल्याचा आरोप प्रशांत रनवरे यांनी केला आहे. 

 राष्ट्रीय आरोग्य मिशनमधील नियुक्त्यांच्या नावाखाली 400 कोटींचा गैरव्यवहार; चौकशीसाठी फडणवीसांचं ठाकरेंना पत्र

रनवरे यांनी या प्रकरणाची तक्रार राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना तसेच मुख्यमंत्री कार्यालय व पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे ट्‌वीटर तसेच ई मेलच्या माध्यमातून केली आहे. वारंवार घडत असलेल्या या प्रकाराची सखोल चौकशी करून विषप्रयोग झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित आरोपीविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 
 भानामतीचा संशय 
वृक्षावर विषप्रयोग केल्याचा संशय व्यक्त करत असताना अंधश्रद्धेतून भानामतीसारखा प्रकार करण्यात आल्याचेदेखील स्थानिकांचे म्हणणे आहे. कारण हा वृक्ष पिंपळाचा असल्याने या वृक्षाभोवती नारळ तसेच भानामती करण्यासाठी वापरण्यात येणारे इतर साहित्यदेखील पडलेले सापडले आहे. 

हिंदुत्व समजून घेण्याची ठाकरेंची बौद्धिक कुवत नाही; भाजप अध्यात्मिक आघाडीची टीका


या परिसरात असलेली अनेक झाडे यापूर्वीही अचानक सुकून नष्ट झालेली आहेत. तसल्याच काहीशा प्रकारातून या वृक्षालादेखील नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू असण्याची शक्‍यता आहे. 
- प्रशांत रनवरे, समाजसेवक 

 

 
संबंधित विभागात याबाबत तक्रार केली गेली असल्यास प्रकारामागील सत्यता तपासण्यात येईल. तसेच कोणी दोषी आढळल्यास त्याविरोधात कारवाई करण्यात येईल. 
 प्रकाश गायकवाड, प्रभाग अधिकारी, पनवेल महापालिका 
 

 
 

Poisoning of trees in Kalamboli

(संपादन ः रोशन मोरे) 

loading image
go to top