मुंबईकर सावधान! "जीबीएस'चा धोका वाढला; काळजी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

मुंबईकर सावधान! "जीबीएस'चा धोका वाढला; काळजी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

मुंबई : कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना "गुलियन बॅंरी सिंड्रोम' (जीबीएस) या दुर्मिळ आजाराचा धोका वाढला असून, या आजाराचे मुंबईत नव्याने 24 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते अशांना काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. 

आजाराबाबत मुंबईतील काही न्यूरोलॉजिस्ट अभ्यास करत आहेत. जीबीएस ज्यामुळे अर्धांगवायू होत आहे. त्यामुळे हा आजार जीवघेणा ठरत आहे. कोव्हिड आणि जीबीएस यांच्यात परस्पर असलेला संबंध तपासण्यासाठी अनेक शहरांतील न्यूरोलॉजिस्टनी एकत्र येऊन भारतात पहिल्यांदाच अभ्यास केला. कोव्हिडपासून आतापर्यंत 2.72 लाख रुग्ण बरे झाले आहेत; परंतु त्यांची परीक्षा तिथेच संपत नाही. संसर्गाच्या प्रभावामुळे बहुतेकदा फुप्फुसातील फायब्रोसिस, मधुमेह, हृदयाशी संबंधित आजारांसारखे कायमचे दुष्परिणाम व्यक्तींमध्ये होत आहेत. अलीकडच्या काळात शहरातील डॉक्‍टर जीबीएसच्या वाढत्या घटना पाहत आहेत. जे रुग्ण वेळेवर संबंधित उपचार घेत नसल्यास हा आजार जीवघेणा असू शकतो. 

काय आहे जीबीएस? 
जीबीएस हा एक दुर्मिळ आजार आहे. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्यास पटकन लागण होते. मज्जातंतू हळूहळू निकामी करून आजाराचा विषाणू बोट, पाय, हात, फुप्फुस, श्‍वसननलिकेवरही हल्ला चढवतो. रुग्णांची अवस्था पक्षाघात म्हणजे लकवा आल्यासारखी होते. बऱ्याचदा श्‍वास घेण्यास अडचणी निर्माण होतात. आजाराच्या संसर्गानंतर आठवडाभराने याची लक्षणे दिसून येतात; पण वेळीच निदान आणि उपचार झाल्यास यातून रुग्ण पटकन बरा होऊ शकतो, असे मुंबई सेंट्रलच्या वोक्‍हार्ट रुग्णालयातील न्यूरोलॉजिस्ट सल्लागार डॉ. प्रशांत माखिजा यांनी सांगितले. 

कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये जीबीएस आजार आढळून आल्याचे जगभरातून अहवाल प्राप्त झाले आहेत. ही एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल गुंतागुंत आहे. बऱ्याचदा रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागते. वेळीच उपचार न झाल्यास श्‍वास घेण्यास अडचणी निर्माण होऊन रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. भारतात ऑगस्टपासून अशी प्रकरणे नोंदली गेली आहेत. 
- डॉ. केदार तोरसकर,
क्रिटिकल केअर युनिटप्रमुख 

जीबीएसची लक्षणे? 
त्वचेत मुंग्या येणे किंवा खाज सुटणे, स्नायू कमकुवत होणे, वेदना होणे, बधिर होणे, पाय आणि हातात पहिल्यांदा लक्षणे दिसू शकतात. त्यानंतर व्यक्तीला अर्धांगवायूचा त्रास सुरू होतो, जो तात्पुरता असू शकतो; परंतु सहा-12 महिने किंवा त्याहून अधिक काळ टिकू शकतो. 

-Mumbaikars beware Increased risk of GBS expert advice to take care

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )ः

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com