

Ulhasnagar Polls BJP Campaign Turns Inward
Esakal
उल्हासनगरमध्ये भाजपनं एका जागेवर दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याचा प्रकार समोर आला. यामुळे निवड प्रक्रिया आता वादात अडकण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक १९ ब मध्ये पक्षाचा एबी फॉर्म शहर भाजप मंडल अध्यक्षांच्या पत्नीलाच दिला होता. तर स्थानिक नेत्यांकडून सध्या अपक्ष असलेल्या कोमल लहरानी यांना दिला गेला. आता यावरून पक्षातच वादाला सुरुवात झालीय. स्थानिकांनी बॅटबॉल चिन्हावर लढणाऱ्या अपक्ष उमेदवार कोमल लहरानी या भाजपच्या अधिकृत उमेदवार असल्याचं स्पष्ट केलंय. तर कमळ चिन्हावर लढणाऱ्या लक्ष्मी कुर्सिजा या बंडखोर असल्याचं सांगितलंय.