Uddhav Thackeray: 'मोदी-शाहांची नावं देखील ऐकली नव्हती, तेव्हापासून...'; भाजपच्या पहिल्या यादीवरुन ठाकरेंचा वार

BJP first list of loksabha election candidate: ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या मुक्त संवाद यात्रेचा आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत समारोप झाला.
Uddhav Thackeray:
Uddhav Thackeray:
Updated on

मुंबई- ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या मुक्त संवाद यात्रेचा आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत समारोप झाला. या यात्रेच्या काळात त्यांनी महाराष्ट्राच्या विविध भागातील जनतेशी संवाद साधला. आपला अनुभव यावेळी त्यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांनीही यावेळी भाष्य केलं. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नसल्यावरुन त्यांनी निशाणा साधला आहे.

सरकार आपल्या कामाची जाहिरात करतंय. पण, लोकांना माहिती आहे की कामं झालेलं नाही. त्यामुळे सर्व लोक नाराज आहेत. शेतकरी, कामगार, उद्योगपती यांच्यात असंतोष आहे. असा समज निर्माण केला जातोय की तेच जिंकणार. पण, ईव्हीएमचा वापर करुन ते जिंकले तर मोठा असंतोष निर्माण होऊ शकतो. जनता क्रांती करु शकते, असं ते म्हणाले. ( BJP first list of loksabha election candidate uddhav thackeray )

Uddhav Thackeray:
BJP Maharashtra: भाजपच्या पहिल्या यादीत का नाही महाराष्ट्रातील एकाही जागेचं नाव? ही आहेत महत्वाची कारणं

तोडाफोडा करुन जिंकल्यास असंतोषणाचा भडका उठेल, याची मला भीती वाटते. भाजपने १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पण, मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं. जेव्हा नरेंद्र मोदी, अमित शाह यांचं नाव ऐकली नाहीत तेव्हापासून मी नितीन गडकरींचे नाव ऐकलं आहे. त्यांच्यासोबत काम केलं आहे. भाजपचा एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे, असं ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray:
BJP First List Lok Sabha: प्रज्ञा ठाकूर...हर्ष वर्धन; भाजपने कोणत्या दिग्गजांचं कापलं तिकीट? जाणून घ्या

नितीश गडकरी यांचे नाव यादीमध्ये नाहीये. उलट ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्या कृपाशंकर सिंह यांचे नाव यादीमध्ये आहे. असे लोक उद्या विजयाची खात्री देत आहेत. शहरांची नावे बदलली गेले, रेल्वे स्टेशनची नावे बदलली. मला वाटतं आता जुमलाबाजीचं नाव गँरटी ठेवलं आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी टीका केली. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com