बड्या नेत्यांचं पुनर्वसन सध्या तरी नाहीच, विधान परिषदेसाठी भाजपकडून 'हे' नवे चेहरे...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 मे 2020

आश्चर्यकारक रित्या गोपीचंद पडळकर, अजित गोपछेडे, प्रवीण दटके आणि  रणजितसिंग मोहिते पाटील यांना विधान परिषदेचं तिकीट दिलं जाणार असल्याचं पक्कं झालंय

मुंबई - महाराष्ट्रातील वातावरण महाराष्ट्रातील राजकारणामुळे कायम तापलेलं असतं. अगदी काही दिवसांपूर्वी चर्चा होती ती उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेतील प्रवेशाची आणि त्यावरून रंगलेल्या राजकीय नाट्याची, पडद्या मागील घडामोडींची. यातच आता विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधून एक मोठी बातमी समोर येतेय. भाजपकडून या विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी पक्षाचे दिग्गज चेहरे मानले जाणारे नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे , चंद्रशेखर बावनकुळे यांना डावललं गेलंय. काही विश्वसनीय सूत्रांकडून याबाबतची माहिती समोर येतेय. त्यामुळे भाजपातील उत्सुक आणि बड्या नेत्यांचं पुनर्वसन लांबणीवर पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय. 

क्या बात हैं ! 18 वर्षीय अर्जुन देशपांडेच्या कंपनीत रतन टाटांची गुंतवणूक, अर्जुनच्या बिझनेसमुळे टाटा इम्प्रेस...

बड्या नेत्यांच्या ऐवजी आता भाजपने रिजनल बॅलन्स सांभाळण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. कारण आश्चर्यकारक रित्या गोपीचंद पडळकर, अजित गोपछेडे, प्रवीण दटके आणि  रणजितसिंग मोहिते पाटील यांना विधान परिषदेचं तिकीट दिलं जाणार असल्याचं पक्कं झालंय. याबाबतची अधिकृत भाजपच्या केंद्रीय संसदीय बोर्डाकडून करण्यात येणार आहे. यापैकी रणजितसिंह मोहिते पाटील यांचं नाव आधीपासून चर्चेत होतं. मात्र इतर तीन नावं चर्चेत नसतानाही उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचं आता स्पष्ट होतंय. 

Big News - गावी जाण्यासाठी इच्छुक नागरिकांसाठी ठाकरे सरकारचा 'मोठा' निर्णय

विधान सभेनंतर विधान परिषदेची उमेदवारी देऊन एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची नाराजी दूर करण्यात येईल असं बोललं जात होतं. स्वतः खडसे यांनी माध्यमांसमोर येत ते इच्छुक असल्याचं देखील सांगितलं होतं. मात्र या सर्वांना आता भाजपकडून दूरच ठेवलं गेल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. अशात आता हे नेते बंडाचं हत्यार उपसतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.  

bjp to give MLC election ticket to ranjitsingh mohite patil padalkar gopchede and pravin datke


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp to give MLC election ticket to ranjitsingh mohite patil padalkar gopchede and pravin datke