क्या बात हैं ! 18 वर्षीय अर्जुन देशपांडेच्या कंपनीत रतन टाटांची गुंतवणूक, अर्जुनच्या बिझनेसमुळे टाटा इम्प्रेस...

विनोद राऊत
Friday, 8 May 2020

औषध विकणाऱ्या ‘जेनेरिक आधार’ची यशस्वी घौडदौड...

मुंबई : स्वस्त दरात औषध उपलब्ध करुन देणाऱ्या ‘जेनेरिक आधार’ या स्टार्ट अपची दखल टाटा उद्योगसमूहाने घेतली आहे. मुंबईच्या अर्जुन देशपांडे या 18 वर्षाच्या तरुणाच्या स्टार्ट अप व्यवसायात रतन टाटा यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. या डिलमुळे केवळ दोन वर्षात 6 कोटींची उलाढाल करणाऱ्या या 18 वर्षीय युवकाने संपुर्ण उद्योजगताचे लक्ष वेधून घेतले आहे.

‘जेनेरिक आधार’चे बिझनेस मॉडेल

दोन वर्षापुर्वी  स्वस्त दरात जेनेरिक औषधं उपलब्ध करुन देण्याचा स्टार्ट अप व्यवसाय अर्जुन देशपांडे यांनी सुरु केला. थेट उत्पादकाकडून औषधी खरेदी करायच्या, त्या ‘जेनेरिक आधार’ या मेडीकल स्टोअर्समधून वाजवी दरात विकायच्या, हे बिझनेस मॉडेल अर्जुनने विकसीत केलं. थेट खरेदीमुळे 15 ते 20 टक्के मार्जीन कमी झालं. त्यामुळे या स्टोअर्समधून वाजवी दरात ग्राहकांना औषध उपलब्ध करुन देणे शक्य झालं.  दोन वर्षात कंपनीने 6 कोटींची आर्थिक उलाढाल केली. मुंबई, पुणे, बँगळुरुसह इतर शहरात ‘जेनेरिक आधार’चे 30 स्टोअर्स उभे राहीले 

Big News - गावी जाण्यासाठी इच्छुक नागरिकांसाठी ठाकरे सरकारचा 'मोठा' निर्णय

‘जेनेरिक आधार ’ची यशस्वी घौडदौड

  • दोन वर्षात कंपनीची 6 कोटीची उलाढाल
  • मुंबई, पुण्यासह देशभरात कंपनीचे 33 मेडीकल स्टोअर्स
  • ठाण्यात जेनेरिक आधारचे मुख्यालय, कंपनीमध्ये 55 कर्मचारी काम करतात
  • दोन वर्षात देशभरात 1  हजार मेडीकल स्टोर जोडण्याचे लक्ष्य
  • कर्करोगावरील स्वस्त औषध उपलब्ध करुन देण्याचे लक्ष्य
  • अनेक मोठ्या औषधी उत्पादक कंपन्यासोबत टायअप

कशी सुचली आयडीया
14 वर्षाचा असताना अर्जुन सुट्टीसाठी आईसोबत परदेशात गेला होता. भारत जेनेरीक औषधांचा सर्वात मोठा  उत्पादक, निर्यात देश असल्याचे त्याचे लक्षात आले. मात्र भारतात औषधं स्वस्त मिळत नाही ही बाब त्याला खटकत होती. औषध क्षेत्रात काम करणाऱ्या आईकडून अर्जुनने यामागील गणित समजून घेतले. मोठ्या कंपन्या जेनेरिक औषध कमी दरात खरेदी करतात, ब्रंडीग करुन त्या महाग दरात विकतात. ही साखळी तोडून ग्राहकांना स्वस्त दरात जेनेरिक औषधी उपलब्ध करुन देण्याचे त्याने ठरवले. ही कल्पना प्रत्यक्षात उतरवायला अर्जुनला चार वर्षे लागली. आई, वडीलांकडून काही भागभाडंवल उभ करुन 2019 मध्ये ‘जेनेरिक आधार’ची कल्पना प्रत्यक्षात उतरवली. 

भाजपनं घेतला धक्कादायक निर्णय ! विधानपरिषदेत मुंडे, खडसेंना वगळून 'यांना' उमेदवारी

दोन वर्षात 6 कोटीची उलाढाल 
सचोटीने व्यापार करुन अर्जुनने अल्पावधीत सामान्य लोकांना औषध स्वस्त दरात तर उपलब्ध करुन दिलेचं. मात्र दोन वर्षात 6 कोटी रुपयाची उलाढालही करुन दाखवली. अर्जुनच्या या स्टार्ट अप मॉडेलने रतन टाटाही प्रभावित झाले. काही दिवसापुर्वी रतन टाटा यांनी या कंपनीत मोठी गुंतवणूक करुन 50 टक्के मालकी मिळवली आहे. लवकरचं कर्करोगावर स्वस्त औषध उपलब्ध करण्याचा त्यांचा मानस आहे. टाटांच्या गुंतवणूकीमुळे अर्जुनला त्याचे स्वप्न पुर्ण करता येणार आहे. 

रतन टाटांची वैयक्तीक गुंतवणूक

रतन टाटा यांनी केलेली गुंतवणूक ही वैयक्तीक स्वरुपाची आहे. नव्या स्टार्ट अप उद्योगांना चालना देण्याचे धोरण टाटा उद्योगसमूहाचे आहे. यापुर्वी कंपनीने ओला, उबर, स्नॅपडील,पेटीएम सारख्य़ा स्टार्ट अपमध्ये गुंतवणूक केली आहे. 


    स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
    Web Title: ratan tata invest in 18 years old arjun deshpandes startup business of generic medicines