Vidhan Sabha 2019 : शिवसेना लहान भाऊच; भाजपने दिल्या एवढ्या जागा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

भाजपने शिवसेनेला लहान भावाप्रमाणे युतीचा फॉर्म्युला ठरविला. शिवसेनेला 124 जागा देत भाजपने 164 जागा आपल्याकडे  ठेवल्या आहेत. भाजप आपल्या जागांपैकी 18 जाग मित्रपक्षांना देणार आहे. 

मुंबई : परस्परांना समवेत घेवून पुढे जाण्याचे भाजप सेनेने पुन्हा एकदा मान्य केले असून, भाजपने शिवसेनेला लहान भावाप्रमाणे युतीचा फॉर्म्युला ठरविला. शिवसेनेला 124 जागा देत भाजपने 164 जागा आपल्याकडे  ठेवल्या आहेत. भाजप आपल्या जागांपैकी 18 जाग मित्रपक्षांना देणार आहे. 

Vidhan Sabha 2019 : भाजपची 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर 

दिल्लीतून राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची नुकतीच दिल्लीत बैठक झाली होती. त्यानंतर सोमवारी चंद्रकांत पाटील यांनी महायुती होणार हे निश्चित केले. अखेर आज युतीचे जागावाटप निश्चित झाले. 

Vidhan Sabha 2019 : मावळला बाळा भेगडे अद्याप अधांतरी

भाजपची 125 उमेदवारांची जाहीर होत असताना युतीचा फॉर्म्युलाही निश्चित झाला. भाजपने शिवसेनेला 124 जागा दिल्या असून, स्वतःकडे 164 जागा ठेवल्या असून, यात मित्रपक्षांचाही समावेश आहे. शिवसेनेने आपल्या विद्यमान आमदारांच्या जागा जवळपास राखल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp gives 124 candidacy to shivsena for maharashtra vidhansabha 2019